रत्नागिरीः रत्नागिरी शहराजवळ शिरगाव ग्रामपंचायत हद्दीत शेट्ये नगर येथील दुमजली घरावरील पहिल्या मजल्यावर असलेल्या घरात सिलेंडरचा स्फोट झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. यामुळे लागलेल्या आगीने मोठा आहाकार उडाला आहे. पहाटे पाच सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला आहे. स्फोटात कुटुंबातील पाच जण अडकले होते. त्यापैकी दोघांना बाहेर काढण्यात यश आले. मात्र, दोन महिला घरातच अडकल्या आहेत. त्याना बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न करण्यात येत आहेत
अश्फाक काझी हे रिक्षा चालक आहेत. त्यांच्या घराला आग लागली आहे. हा स्फोट इतका भीषण होता की जवळपास दोन किलोमीटरच्या परिसरात या स्फोटाचा आवाज ऐकू गेला. अश्फाक काझी पहाटे पाचच्या सुमारा घरी आले व त्यांनी लाईट लावली. त्यानंतरच स्फोट झाल्याचे बोलले जात आहे
Facebook Comments Box
Related posts:
धक्कादायक! तारकर्ली समुद्र किनार्यावर पुण्याचे ३ युवक बुडाले; दोघांचा मृत्यू, एक अत्यवस्थ
महाराष्ट्र
धोक्याच्या ठिकाणी रील बनवणे जिवावर बेतले; रायगडमध्ये धबधब्यात पडल्याने रिल्स इन्फ्लुएंसर अन्वी कामदा...
महाराष्ट्र
'भेदभाव' केल्याबद्दल लालबागचा राजा मंडळाच्या कार्यकर्त्यांविरुद्ध तक्रार दाखल
महाराष्ट्र