मुंबई :आजपासून 4 दिवस म्हणजे 28 ते 31 जानेवारीपर्यंत बँका बंद राहतील. बँक कर्मचारी 30 आणि 31 जानेवारीला संपावर (Bank Strike) जाणार आहेत. यापूर्वी 28 जानेवारीला महिन्याचा चौथा शनिवार आणि 29 जानेवारीला रविवार असल्याने बँका बंद राहणार होत्या. अशा परिस्थितीत लोकांना त्रासाला सामोरे जावे लागू शकते. मात्र, या काळात इंटरनेट बँकिंगची सुविधा सुरू राहणार आहे. यामुळे लोक पैशाचे व्यवहार करू शकतील.
दोन दिवस संपावर
संपाबाबत देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने सांगितले की, 30-31 जानेवारी रोजी युनियन फोरम ऑफ बँक युनियन्सने पुकारलेल्या दोन दिवसांच्या संपाचा परिणाम त्यांच्या शाखेतील कामगारांवर होऊ शकतो. बँक कर्मचाऱ्यांच्या या संपात देशभरातील बँक शाखा कर्मचारी सहभागी होणार आहेत. ग्राहकांनी त्यांचे शाखेशी संबंधित काम अगोदरच निकाली काढले तर बरे होईल.
संपूर्ण देशात संप
SBI ने सांगितले की, आम्हाला इंडियन बँक्स असोसिएशन (IBA) ने कळवले आहे की युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (UFBU) ने UFBU शी संबंधित संघटनांना म्हणजे AIBEA, AIBOC, NCBE, AIBOA इत्यादींना संपाची नोटीस जारी केली आहे. बँक कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी 30 आणि 31 जानेवारी 2023 रोजी देशव्यापी बँक संपावर जाण्याची घोषणा केली आहे.
बँक कर्मचाऱ्यांच्या 5 मागण्या
एआयबीईएचे सरचिटणीस सीएच वेंकटचलम म्हणाले की, बँक कर्मचाऱ्यांच्या 5 मागण्या आहेत. बँकिंग वर्किंग कल्चरमध्ये सुधारणा करा, बँकिंग पेन्शन अपडेट करा, नॅशनल पेन्शन सिस्टम (NPS) रद्द करा, पगारात सुधारणा करा आणि सर्व कॅडरमध्ये भरती करा आदी मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे.
Vision Abroad