पुणे : दहावी आणि बारावीच्या निकालाबाबत महाराष्ट्र स्टेट बोर्डाने निकालाच्या तारखे संदर्भात एक बातमी प्रसिद्ध केली आहे. या बातमीत बारावीचा निकाल २ जूनपूर्वी तर दहावीचा निकाल १० जूनपर्यंत जाहीर होईल, असा विश्वास बोर्डाने व्यक्त केला आहे.
बारावीची परीक्षा संपली आहे तर आज शनिवारी दहावी चा शेवटचा पेपर आहे. जुन्या पेन्शनच्या संपामुळे बारावीच्या निकालास थोडा विलंब लागणार आहे.उत्तरपत्रिकांची तपासणी युद्धपातळीवर सुरु असून वर दिलेल्या तारखां पर्यंत निकाल जाहीर केला जाणार आहे असे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत सांगण्यात आले आहे.
यंदा बोर्डाच्या परीक्षेसाठी इयत्ता बारावीचे १५ लाख ३० हजार विद्यार्थी तर इयत्ता दहावीचे जवळपास १४ लाख विद्यार्थी बसले होते. कोरोनामुळे मागील वर्षी ‘शाळा तेथे केंद्र’ अशी परीक्षा पार पडली होती. त्यावेळी १०० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. पण, हुशार, होतकरू मुलांवर अन्याय होऊ नये म्हणून बोर्डाने यंदा कॉपीमुक्त परीक्षेसाठी ‘नांदेड पॅटर्न’ लागू केला होता. त्यामुळे शाळांमधील सामुहिक कॉपी प्रकरणांना निश्चितपणे आळा बसला. काही अपवाद वगळता पेपर फुटीचे प्रकार देखील नियंत्रित आले आहेत.
Vision Abroad