आंबोली: गोव्यावरून कर्नाटक राज्यात जात असताना आंबोली येथे लघुशंकेसाठी उतरलेल्या छत्तीसगड येथील एका पोलीस कर्मचाऱ्याचा दरीत कोसळल्याने आंबोली येथेजागीच मृत्यू झाला आहे. ही घटना काल सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास मुख्य धबधब्यापासून काही अंतरावर घडली.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि मिथिलेश पॅकेरा हे छत्तीसगड पोलीस तुकडी बरोबर कर्नाटक होत असलेल्या निवडणुकीसाठी बंदोबस्तासाठी कर्नाटकात आले होते. दरम्यान काही काल सुट्टी असल्याने त्याने आणि त्याच्या इतर ४ मित्रांनी गोवा फिरायला जाण्याचा बेत आखला. तेथून परत येत असताना त्यांनी गाडी आंबोली येथे मुख्य धबधब्याच्या काही अंतरावर लघुशंकेसाठी गाडी थांबवली. मिथिलेश यांना काळोखात तुटलेल्या कठड्याचा अंदाज न आल्याने ते दरीत कोसळले. ही घटना घडताच त्यांच्या सहकाऱ्यांनी त्वरित आंबोली पोलीस स्टेशन ला कॉन्टॅक्ट केला आणि मदत मागवली. आंबोली रेस्क्यू टीमचे अजित नार्वेकर आणि मायकल डिसोझा आणि त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले आणि दरीत उतरून बचावकार्य सुरु केले, मात्र परंतु तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. याबाबतची माहिती मिळतात सावंतवाडी उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी सोळंके, प्रभारी पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी, पोलीस हवालदार दत्ता देसाई आदी सहका-यांनी त्या ठिकाणी धाव घेत सहकार्य केले. याबाबत उशिरा पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले..
Facebook Comments Box
Vision Abroad