Mumbai Goa Vande Bharat Express |मुंबई गोवा वंदे भारत एक्सप्रेस कोकण रेल्वे मार्गावर धावणार आहे हे निश्चित झाल्यापासून या एक्सप्रेसच्या वेळापत्रकाबाबत, थांब्यांबाबत या मार्गावरील प्रवास करणाऱ्या प्रवाशांना उत्सुकता लागून राहिली होती. खासकरून या गाडीला कोणत्या स्थानकांवर थांबा मिळणार आहे याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात होते. मध्य रेल्वे प्रशासनाने एक प्रसिद्धीपत्रक जाहीर केले असून त्यात या गाडीचे थांबे आणि वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यामुळे या गाडीच्या थांब्या बाबत असलेल्या प्रश्नांस उत्तर मिळाले आहे.
या गाडीला दादर, ठाणे,पनवेल, रोहा, खेड, रत्नागिरी, कणकवली, थिवी ही स्थानके मिळाली आहेत.
नॉन मान्सून वेळापत्रकानुसार ही गाडी सकाळी 5 वाजून 25 मिनिटांनी ही एक्सप्रेस सिएसएमटी स्थानकावरून सुटणार आहे ती दुपारी 13.15 वाजता मडगाव या स्थानकावर पोहोचेल.
परतीच्या प्रवासात ती मडगाव स्थानकावरून दुपारी 14:35 वाजता सुटून सिएसएमटी स्थानकावर रात्री 22:25 वाजता पोहोचणार आहे.
कोकण रेल्वे मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस शुक्रवार वगळता सर्व दिवशी धावणार आहे

Vision Abroad


