सिंधुदुर्ग | ”आंबोली घाटात शस्त्रधारी टोळीची दहशत” या मथळ्याखाली खोटी बातमी पसरवून आंबोली पर्यटन स्थळाची बदनामी केली गेली आहे असा आरोप आंबोली ग्रामपंचायतीने एका प्रसारमाध्यमावर केला आहे.
NTC मीडिया ब्रेकिंग न्यूज या प्रसारमाध्यमाच्या वतीने दिनांक ०६/०६/२०२३ रोजी “आंबोली घाटात शस्त्रधारी टोळीची दहशत” या मथळ्याखाली एक बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती. या बातमीत कोणत्याही प्रकारचे तथ्य नाही आहे. सदर बातमीमुळे आंबोली पर्यटन स्थळाची बदनामी झाली असून त्याचा परिणाम येणाऱ्या पावसाळी पर्यटनावर होणार आहे. या प्रसार माध्यमाची चौकशी करून त्यांच्याकडे या बातमीबद्दल काही पुरावा असल्यास सादर करण्यास सांगावे; ठोस पुरावा न सादर केल्यास या प्रसार माध्यमाविरोधात कारवाई करण्यात यावी. तसेच या बदनामीबद्दल त्या प्रसार माध्यमाच्या जबाबदार व्यक्तीने आंबोलीत उपस्थित राहून माफी मागावी व इतर माध्यमांमध्ये प्रसिद्ध करावी. अशा आशयाचे पत्र ग्रामपंचायतीने पोलीस निरीक्षक, सावंतवाडी यांना दिली आहे.
Facebook Comments Box
Related posts:
कोकण रेल्वेभरती : नेहमीप्रमाणे कोरेने प्रकल्पग्रस्तांना दिल्या वाटाण्याच्या अक्षता- कोकणभूमी प्रकल्प...
कोकण
Konkan Railway: मुंबईतील मुसळधार पावसाचा कोकण रेल्वेलाही फटका; या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
कोकण
मोठी बातमी: बळवली-पत्रादेवी कोकण द्रुतगती मार्गाच्या संरेखनात बदल होणार; नवीन डीपीआर येणार..कारण काय...
कोकण