Monsoon 2023 : बिपरजॉय चक्रीवादळ, अल निनो तसेच अन्य काही घटकांमुळे यंदा मॉन्सूनचा वेग काहीसा मंदावला होता; परंतु आता पुन्हा मॉन्सून सक्रिय झाला असून शनिवारी तो कारवारात दाखल झाला आहे.
सोमवारी मॉन्सून गोवा आणि तळकोकणात दाखल होईल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. शनिवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यात सायंकाळी मॉन्सूनपूर्व सरींनी जोरदार हजेरी लावल्याने उष्म्याने हैराण झालेल्या कोकणवासियांना दिलासा मिळाला.
कर्नाटकचा बहुतांश भाग व्यापला
मॉन्सून यंदा केरळमध्ये तब्बल दहा दिवस उशिरा दाखल झाला. याचदरम्यान अरबी समुद्रात बिपरजॉय चक्रीवादळ निर्माण झाले. यामुळे मॉन्सून विस्कळीत होईल की काय, अशी भीती हवामान शास्त्रज्ञांसह सर्वांनाच होती.
मात्र, या चक्रीवादळामुळे मॉन्सून गतिमान होण्याला मदत झाल्याने संपूर्ण पश्चिम घाटात मॉन्सूनसरी कोसळत आहेत. मॉन्सूनने शनिवारपर्यंत केरळ, कर्नाटकचा बहुतांश भाग व्यापला असून सोमवारी गोवा आणि तळकोकणात दाखल होईल, अशी शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
https://twitter.com/Hosalikar_KS/status/1667577466855239681?s=19
Vision Abroad