Mumbai Goa Highway :सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज सकाळी महामार्गाच्या परिस्थितीची पहाणी केली आहे. या पाहणी दरम्यान त्यांनी दुरुस्ती आणि काँक्रिटीकरणाचाही आढावा घेतला.
मुंबई गोवा महामार्गाचे काम गेल्या १३ वर्षांपासून रखडले आहे. अनेक प्रयत्न करूनही रस्त्याचे काम मार्गी लागताना दिसत नाही. अशातच गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे महामार्गाची अवस्था बिकट झाली आहे. रस्त्याला ठिकठिकाणी भरमसाठ खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालक आणि कोकणातील प्रवाशांचे हाल होत आहेत. ही बाब लक्षात घेऊन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी महामार्गाची पाहणी केली. रस्ते दुरस्तीसाठी सिमेंट बेस ट्रीटमेंट पद्धतीचा वापर केला जात असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी इंदोर येथून यंत्र सामुग्री आणण्यात आली असून आणखीन काही यंत्र दोन दिवसांत दाखल होणार आहेत. या पद्धतीमुळे पावसातही रस्ता दुरुती करणे शक्य होणार आहे. कुठल्याही परिस्थितीत गणेशोत्सवापूर्वी रस्त्याच्या एका मार्गिकेचे काम पूर्ण केले जाईल आणि डिसेंबर अखेरपर्यंत दोन्ही मर्गिककेचे काम पूर्ण होईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
Facebook Comments Box
Vision Abroad