Konkan Railway News: कोकणरेल्वे मार्गावर गणेशोत्सवासाठी चालविण्यात येणाऱ्या मेमू गाड्यांच्या वेळापत्रकांत आणि थांब्यामध्ये काहीसा बदल करण्यात आला आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी हा बदल केला गेला असून प्रवाशांनी या बदलांची नोंद घेऊन आपल्या प्रवासाची योजना आखावी असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे काण्यात आले आहे.
अतिरिक्त थांबे
०११५३/०११५४ दिवा रत्नागिरी दिवा संपूर्ण अनारक्षित गणपती विशेष मेमू वीर ते खेड ह्या ५१ किलोमीटर अंतरात कुठेही थांबत नसल्याने या गाडीला किमान दोन वाढीव थांबे देण्याची मागणी कोकण विकास समितीने तसेच इतर संघटनांनी मागणी केली होती. त्यानुसार या गाडीला करंजाडी आणि अंजनी या दोन स्थानकांवर प्रत्येकी २ मिनिटांचे थांबे देण्यात आले आहेत.
०११५३ दिवा रत्नागिरी मेमू या गाडीची करंजाडी या स्थानकावर येणायची वेळ सकाळी १०:४० असून अंजनी स्थानकावरची वेळ ११:४५ आहे.
०११५४ रत्नागिरी दिवा मेमू या गाडीची करंजाडी या स्थानकावर येणायची वेळ सायंकाळी १८:३० असून अंजनी स्थानकावरची वेळ १७:३२ आहे.
हा बदल या गाडीच्या सुरवातीपासून म्हणजे १३/०९/२०२३ पासून अमलात आणला जाणार आहे.
वेळापत्रकात बदल
०११५६ चिपळूण दिवा मेमू या गाडीच्या चार स्थानकांच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आला आहे.
सुधारित वेळापत्रकानुसार ही गाडी
- चिपळूण या स्थानकावर १३:१० वाजता (पूर्वीची वेळ १३:००),
- अंजनी स्थानकावर १३:२६ (पूर्वीची वेळ १३:१५),
- खेड स्थानकावर १३:३९ (पूर्वीची वेळ १३:३१)
- कळंबणी बुद्रुक १३:४७ (पूर्वीची वेळ १३:४३)
या वेळेस या स्थानकांवर येणार आहे. हा बदल दिनांक १४ सप्टेंबर २०२३ पासून अमलांत आणला जाणार आहे.
Facebook Comments Box
Vision Abroad