Konkan Railway News :कोंकण रेल्वे मार्गावर धावणारी लांब पल्ल्याची एलटीटी – एर्नाकुलम दुरांतो एक्सप्रेस या जलद गाडीला पनवेल या स्थानकावर थांबा मिळणार आहे. 26 ऑगस्ट पासून हा बदल अमलात आणला जाणार असल्याचे मध्य रेल्वेने जाहीर केले आहे.
आठवड्यातुन दोन दिवस धावणारी या गाडीची पनवेल स्थानकावर थांबण्याची वेळ जाहीर करण्यात आली आहे. एलटीटी स्थानकावरून रात्री 20:50 वाजता सुटणारी गाडी क्रमांक 12223 एलटीटी – एर्नाकुलम दुरांतो एक्सप्रेस पनवेल स्थानकावर रात्री 21: 44 वाजता येणार असून दोन मिनिटांचा थांबा घेऊन निघणार आहे. या गाडीचा रत्नागिरी या स्थानकावरील वेळ रात्री 02:25 असून या स्थानकावर तिचा पाच मिनिटांचा थांबा आहे.
परतीच्या प्रवासात एर्नाकुलम स्थानकावरून रात्री 21:45 वाजता सुटणारी गाडी क्रमांक 12224 एलटीटी – एर्नाकुलम दुरांतो एक्सप्रेस पनवेल स्थानकावर संध्याकाळी 17:02 वाजता येणार असून दोन मिनिटांचा थांबा घेऊन निघणार आहे. या गाडीचा रत्नागिरी या स्थानकावरील वेळ दुपारी 15:30 असून या स्थानकावर तिचा पाच मिनिटांचा थांबा आहे.
अतिजलद आणि आरामशीर प्रवासासाठी दुरांतो एक्सप्रेस ओळखली जाते. एलटीटी – एर्नाकुलम दुरांतो एक्सप्रेस 12223/24 ही गाडी एलटीटी – एर्नाकुलम या स्थानकादरम्यान ही फक्त रत्नागिरी, मडगाव, कोझिकोडे मेन आणि मंगुळुरु या चार स्थानकावर थांबते. एलटीटी वरून सुटून ही गाडी डायरेक्ट रत्नागिरी स्थानकावर थांबत होती. या गाडीला पनवेल येथे थांबा मिळावा यासाठी अनेक दिवसांपासून मागणी होती. रेल्वे बोर्डाने ही मागणी पूर्ण केली आहे. मात्र दक्षिणेकडील कुन्नूर, कासारगोड आणि शोरानूर या स्थानकावर या गाडीला थांबा मिळावा या मागणीकडे रेल्वे बोर्डाने दुर्लक्ष केले आहे.
Vision Abroad