गोवा वार्ता : स्वस्तात मस्त आणि मुबलक मिळणारा बांगडा मत्स्यखवय्ये कोकणकरांच्या ताटाची चव वाढवत असतो. बांगडा सहसा १५ ते 20 सेंटिमीटर लांबीचा असतो. मात्र कर्लीसारखा हातभर लांबलचक बांगडाही असू शकतो, असे सांगितले तर तुमचा यावर विश्वास बसणार नाही. पण हे खरं आहे. कारवारजवळील समुद्रात तब्बल दीड फुटांपेक्षा (४८ सेंटीमीटर) लांब आणि १२ सेंटीमीटर रुंद बांगडा सापडला आहे.
कारवारजवळील समुद्रात भला मोठा बांगडा सापडल्याने सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे. कारण या बांगड्याची लांबी तब्बल ४८ सेंटीमीटर, आणि रुंदी पाहिली तर १२ सेंटीमीटर एवढी आहे. म्हणजे याचे वजन साधारणपणे १ किलो २३० ग्रॅम एवढे आहे. एवढ्या मोठ्या आकाराचा बांगडा सापडणे ही पहिलीच घटना आहे.
हा बांगडा मच्छीमार युवा नेते विनायक हरीकम यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. त्यानंतर तो पुढील अभ्यासासाठी समुद्री जीवशास्त्र पीजी सेंटरकडे पाठवण्यात आला आहे. जेणेकरून जिज्ञासूंना हा बांगडा आता पाहता येणार आहे. सेंट्रल मरीन फिशरी संशोधन केंद्राच्या अधिकाऱ्यांनी या दुर्मिळ बांगड्याची पाहणी केली.
Vision Abroad