ठाणे : मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाण्यात अनेक मराठी शहरांच्या नावाचा चुकीचा उच्चार करण्याचे प्रकार घडत आहेत. आता तर सरकारी कार्यालयात, कागदोपत्री आणि सार्वजनिक ठिकाणांच्या दर्शक फलकांवर ही चुकीची नावे वापरून तीच कायम करण्यात आल्याचे प्रकारही घडत आहेत.
रेल्वे प्रशासना सुद्धा या गोष्टीत मागे नाही आहे. रेल्वेमध्ये परप्रांतीय कर्मचाऱ्यांचा जास्त भरणा असल्याने रेल्वेत असे प्रकार मोठ्या प्रमाणात घडताना दिसत आहेत.
ठाणे ते पनवेल लोकल रेल्वे प्रशासनाने असाच एक प्रकार केल्याचा नेरुळ या स्थानकाच्या नावाच्या बाबतीत घडला आहे. या स्थानकाचे नाव ‘नेरूळ’ असताना ते वेळापत्रक दर्शिकेत चुकीच्या पद्धतीने म्हणजे ‘नेरूल’ असे दाखविण्यात आले आहे.
याविरोधात मराठी एकीकरण समितीने आक्षेप घेतला आहे. नेरूळ गंतव्य स्थानकाच्या नावाचा अचूक मराठी देवनागरी लिपीत वापर करण्यात यावा.विहीत मुदतीत बदल न केल्यास पीजी पोर्टलवर तक्रार नोंद करण्यात येईल. असा इशारा या समितीने दिला आहे