सावंतवाडी रोड स्टेशनला सुसज्ज टर्मिनस बनवून त्याला कोकण रेल्वेचे शिल्पकार प्रा.मधू दंडवते यांचे नाव देण्यात यावे अशी अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीने कोकण रेल्वेकडे केली मागणी
Follow us onआवाज कोकणचा : कोकण रेल्वेला नुकतीच २५ वर्ष पूर्ण झाली.कोकण रेल्वेचा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी कोकणातील भूमिपुत्रांनी आपल्या स्वतःच्या जमिनी या बहाल केल्या, मात्र कोकण रेल्वेतून कोकणातील भूमिपुत्राला काय मिळाले हा प्रश्न आजही निरूत्तरीतच आहे, या ठिकाणी भूमिपुत्रांना अपेक्षित असणारा सुलभ आणि सोयीस्कर प्रवासा आजही होताना दिसत नाही, यासाठीच कोकणात सावंतवाडी रोड येथे सुसज्ज टर्मिनस बनवावे व त्याला कोकण रेल्वेचे शिल्पकार प्रा.मधू दंडवते यांचे नाव दयावे अशी मागणी अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीच्या वतीने करण्यात येत आहे.
गणेश उत्सवाच्या दरम्याने सर्व कोकण रेल्वे प्रवासी संघटना साधारण ३०० ते ३५० रेल्वेच्या फेऱ्यांची मागणी करतात मात्र कोकणात सुसज्ज टर्मिनस नसल्याने गणपतीबाप्पा कोकणात आणि सर्व गणपती स्पेशल ट्रेन दक्षिणेतील गोवा,कर्नाटक, केरळ व तामिळनाडू राज्यात न्याव्या लागतात. त्यामुळे गणपतीस्पेशल रेल्वे सोडूनही अर्धा रिझर्वेशन कोटा हा दक्षिणेतील राज्यांना मिळतो व खरा लाभार्थी वेटींगलिस्टमध्येच राहतो. त्यामुळे कोकणातील भूमिपुत्रांना कोकण रेल्वेचा काहीच फायदा होताना दिसत नाही.
सावंतवाडी स्टेशन येथे फेज एक मध्ये फक्त प्याटफॉर्म व ब्रिजचे काम करण्यात आले मात्र टर्मिनस म्हणून आवश्यक असणारे मुबलक पाणी, ट्रेन सरव्हिसींग व मेंटेनसचे काम येथे होत नसल्याने या कामासाठी पुढील राज्यांचा आधार घ्यावा लागतो.परिणामी कोकणातील प्रवाशांना कोकण रेल्वेच्या सेवेचा अपेक्षित फायदा घेता येत नाही.सावंतवाडी येथे सुसज्ज टर्मिनस झाल्यास प्रतिक्षेत असलेल्या वसई सावंतवाडी पॅसेंजर,कल्याण सावंतवाडी पॅसेंजर,दादर चिपळूण मेमू व सिएसएमटी रत्नागिरी इंटरसिरी एक्सप्रेस अशा कोकणाच्या हक्काच्या कमी अंतराच्या रेल्वे चालवल्या जातील त्याचा फायदा कोकणातील भूमिपुत्रांना होईल,अशी प्रवासी संघटनेची धारणा आहे.
सावंतवाडी रोड टर्मिनसच्या कामाला गती मिळावी यासाठी १६ मे २०२३ रोजी सावंतवाडी रोड स्टेशन मास्तर यांना वसई सावंतवाडी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले तर २६ जाने.२०२४ रोजी अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीच्या वतीने स्थानिक भूमिपुत्रांच्या सहकार्याने लाक्षणिक उपोषणही करण्यात आले.
म्हणूनच सावंतवाडी रोड स्टेशन ला सुसज्ज टर्मिनस बनवून त्याला कोकण रेल्वेचे शिल्पकार प्रा.मधू दंडवते साहेब यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीच्या वतीने करण्यात येत आहे.
-अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती- मुंबई
Ad -
मराठी मुलांमुलींना युरोप, पोर्तुगाल,माल्टा,इटली आणि पोलंड
येथे नोकरीच्या संधी....
🔸Retail Jobs
🔸Malls
🔸Corporate Staff
🔸Sales
🔸Back Office
🔸Hotels
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.
Facebook Comments Box
Vision Abroad