आंबोली: पाऊस सुरू झाल्यावर वर्षा पर्यटनासाठी आंबोलीत पर्यटकांचा ओघ सुरू होतो. मात्र या वर्षी धबधब्याच्या परिसराची स्वच्छता तसेच शिस्त राखण्यासाठी वन विभागाकडून काही निर्णय घेतले गेले आहेत. येथील शिस्त आणि स्वच्छतेचे नियम मोडणाऱ्या पर्यटकांवर कारवाई केली जाणार आहे.
अनेक पर्यटक येथील माकडांना खाऊ टाकतात. मात्र त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता निर्माण होते. माकड किंवा वानरांचे माणसांवर होणारे हल्ले पण वाढताना दिसतात. दुसरी गोष्ट म्हणजे या असे खाद्यपदार्थ घातल्याने या प्राण्यांच्या सवयींवर परिणामी पर्यावरणावर सुद्धा परीणाम होतो. त्यामुळे या परिसरात माकडांना खाद्यपदार्थ घालण्यास मनाई केली असून,जर कोणी तसे केलेले आढळल्यास किमान 1000 रुपये एवढा दंड वसूल केला जाणार आहे. त्याविषयी या परिसरात कचरा टाकणाऱ्या बेशिस्त वर्तन करणाऱ्या पर्यटकांस कारवाईला सामोरे जावे लागेल. दिनांक 15 जून पासून ही कारवाई सुरू करण्यात असल्याची महिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
स्वच्छता मोहीम
पावसाळा सुरू झाल्याने आंबोली घाटात लवकरच वर्षा पर्यटन सुरू होणार असल्याने वन विभागाच्या अखत्यारीत येत असलेल्या निसर्गरम्य आंबोली घाट व धबधबा परिसराची सावंतवाडी वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्यावतीने शुक्रवारी सामूहिक स्वछता मोहीम राबविण्यात आली. या स्वछता मोहिमे अंतर्गत घाट सुरु होण्याच्या ठिकाणापासून ते अंदाजे १० किमी अंतराच्या रस्ता दुतर्फा परिसराची स्वच्छता करण्यात आली.
Facebook Comments Box
Vision Abroad