गणेशभक्तांसाठी महत्त्वाची बातमी: एसटी महामंडळाने एसटी आरक्षणाबाबत घेतला मोठा निर्णय.

   Follow us on        

मुंबई:कोकणातील सर्वात मोठा सण म्हणुन ओळखला जाणारा गणेशचतुर्थी सण अवघ्या दोन महिन्यांवर आला. यंदा गणेश भक्तांचा प्रवास सोयीचा व्हावा यासाठी राज्य परिवहन (एसटी) महामंडळाच्या गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या नियमित आणि विशेष गाड्यांचे आरक्षण लवकरच सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सामान्यतः एसटीचे आरक्षण एक महिना अगोदर सुरू होते, मात्र प्रवाशांच्या सोयीसाठी यंदा एसटी गाड्यांचे आरक्षण 60 दिवसआधी खुले करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे.

अॅप किंवा वेबसाईटवरुनही करता येईल बुकींग
कोकणातील अनेक चाकरमानी हे गावी जाण्यासाठी गणेशोत्सवासाठी वाड्या-वाड्यांचे एकत्रित आरक्षण करतात. त्याच पार्श्वभूमीवर आता प्रवाशांना वैयक्तिक आरक्षणासह समूह आरक्षणही एकाच दिवशी करता येणार आहे. महामंडळाच्या आरक्षण केंद्रासह मोबाईल अॅप आणि महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रवाशांना आरक्षणाचा लाभ घेता येणार आहे.

सविस्तर वेळापत्रक लवकरच जाहीर होणार
कोकणासह राज्यातील सर्व विभागांमध्ये गणेशोत्सव काळासाठी नियमित आणि विशेष गाड्यांचे आरक्षण गुरुवारपासून खुले होणार आहे. सध्या धावणाऱ्या नियमित गाड्या वेळापत्रकाप्रमाणे सुटतील. त्यासोबतच मुंबई सेंट्रल, परळ, पनवेल आणि कुर्ला नेहरूनगर या ठिकाणाहून २ आणि ३ सप्टेंबरपासून जादा गाड्या सोडल्या जाणार आहेत. तर कणकवली, राजापूर, विजयदुर्ग, दापोली, भालावली, देवगडदरम्यान जादा एसटी फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. त्यासोबतच गणेशोत्सवासाठी जादा गाड्यांचे सविस्तर वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल, अशी माहिती एसटी प्रशासनाने दिली.

Loading

Facebook Comments Box

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search