मुंबई : 2023 विश्वचषकाचा अंतिम सामना मुंबईत ठेवण्याचा बेत होता. मात्र वानखेडे स्टेडियम च्या कमी प्रेक्षक संख्येचे कारण देवून तो सामना गुजरात राज्यातील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळविण्यात आला. क्रिकेटप्रेमी मुंबईकरांना याचे मोठे दुःख झाले होते. मात्र आता मुंबईजवळ लवकरच 1 लाख आसन क्षमतेचं स्टेडियम उभारलं जाणार आहे. हे स्टेडियम आसन क्षमते बाबतीत राज्यातील पाहिले तर देशातील दुसर्या क्रमांकाचे स्टेडियम ठरणार आहे.
पाहिल्या मुंबईमध्ये वानखेडे, ब्रेबॉर्न आणि नवी मुंबईत डी.वाय.पाटील ही आंतरराष्ट्रीय स्डेटियम असताना आता मुंबईला आणखी एक अद्ययावत आणि 1 लाख क्षमता असलेलं स्टेडियम मिळणार आहे.
मुंबई क्रिकेट असोसिएशन मुंबईच्या वानखेडे स्टेडियमपासून 68 किमी अंतरावर आणि ठाण्यापासून 26 किमी अंतरावर हे स्टेडियम उभारलं जाणार आहे. कल्याणच्या जवळ अमाने गावामध्ये हे स्टेडियम उभारलं जाईल. 50 एकर जमिनीवर हे स्टेडियम उभारलं जाईल.
ही जमीन विकत घेण्यासाठी एमसीएने एमएसआरडीसीने काढलेली खुली निविदा भरली आहे. महाराष्ट्र सरकारकडून स्टेडियम उभारणीला परवानगी मिळावी, याची एमसीए वाट पाहत आहे. मुंबईमध्ये एवढं मोठं स्टेडियम उभारण्याचं दिवंगत एमसीए अध्यक्ष अमोल काळे यांचं स्वप्न होतं. मागच्याच महिन्यात अमोल काळे यांचं 47व्या वर्षी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं.
Vision Abroad