सिंधुदुर्ग, दि.१३ जुलै: आंबोली घाटातून जाणारा संकेश्वर- बांदा राष्ट्रीय महामार्गाचे काम आता वेगाने होणार आहे. या मार्गाची आंबोली ते सावंतवाडी व तेथून इन्सुली ते बांदा हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून त्याकरिता ४२ कोटी रकमेची निविदाही काढण्यात आली आहे.
आंबोली घटवून येणार हा महामार्ग दुपदरी असून सिमेंट – काँक्रीटचा असणार आहे. तो आंबोली घाटातून पुढे सावंतवाडी शहरातूनच बांद्याकडे जाणार आहे. याबाबत बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून दुजोरा देण्यात आला आहे. अधिकृत माहितीसाठी राष्ट्रीय महामार्गाचे अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता,आताच या महामार्गाची हस्तांतरण प्रक्रिया चालू झाली आहे. त्यामुळे अधिकृत माहिती देवू शकत नाही. असे त्यांचे म्हणणे आहे.
केंद्राकडून जाहीर करण्यात आलेला संकेश्वर-बांदा हा महामार्ग सावंतवाडी शहरातून जाणार की दाणोली, बावळाट येथून जाणार हा गेले अनेक दिवस प्रश्न होता. परंतु या प्रश्नाला आता पूर्णविराम मिळणार आहे.
हा महामार्ग संकेश्वर, गडहिंग्लज, आजरा, आंबोली माडखोल ते सावंतवाडी गवळीतिठा आणि तेथून इन्सुली ते बांदा असा जाणार आहे. याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून ४२ कोटीची निविदा काढण्यात आली आहे. मात्र अद्याप पर्यंत कोणाला वर्कऑर्डर देण्यात आलेले नाही. सद्यस्थितीत संकेश्वर पासून आजरा फाटा येथे पर्यंत हे काम सुरू आहे. आंबोली ते सावंतवाडी हा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असलेला भाग राष्ट्रीय महामार्गाकडे हस्तांतरण करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्या संदर्भातले पत्र संबंधित विभागाला लवकरच देण्यात येणार आहे, असे सांगण्यात आले आहे.
Facebook Comments Box