Konkan Railway News: पावसाळ्यात संपूर्ण कोकण मार्ग धोकादायक बनतो; धोक्याच्या ठिकाणी दरडी कोसळण्याच्या धोका असतोच शिवाय अन्य विपरीत गोष्टी घडण्याची भीतीही जास्त असते. अशा वेळी या मार्गावरील चालणाऱ्या गाड्यांच्या चालकांना नेहमीच सावध आणि तत्पर राहावे लागते. लोको पायलटने दाखवलेल्या सावधानतेमुळे असाच एक अपघत होता होता टळला आहे. कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या गाडी क्रमांक १२६१९ मत्स्यगंधा एक्सप्रेसचा मोठा अपघात लोको पायलट आणि सहाय्यक लोको पायलटने दाखवलेल्या समयसूचकतेमुळे टळला. बारकुर आणि उडुपी विभागादरम्यान येत असताना, या गाडीचे लोको पायलट आणि सहाय्यक लोको पायलटने ट्रॅकवर पडलेले एक मोठे झाड पहिले आणि तत्परतेने आपत्कालीन ब्रेक लावला आणि गाडी थांबवून हा अपघात टाळला.
यावेळी लोको पायलट म्हणून श्री पुरुषोत्तम आणि सहाय्यक लोको पायलट श्री मंजुनाथ नाईक कर्तव्यावर होते. त्यांच्या सतर्कतेची आणि समयसूचकतेची दखल घेऊनकोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (KRCL) चे व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांनी प्रत्येक चालक दलातील (Crew) सदस्यांसाठी प्रत्येकी 15,000 रुपये रोख बक्षीस जाहीर करून त्यांचा सन्मान केला.
Facebook Comments Box
Vision Abroad