Shaktipeeth Expressway Updates: महाराष्ट्र सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपूर पत्रादेवी शक्तीपीठ द्रुतगती महामार्गाबद्दल एक महत्वाची अपडेट्स समोर येत आहे. या द्रुतगती मार्गावर आंबोलीजवळ पश्चिम घाटाखाली दोन मोठे बोगदे खोदले जाणार आहेत. या बोगद्यांची एकूण लांबी २१.९ किलोमीटर असणार आहे. हे काम पूर्ण झाल्यास तो देशातील सर्वात मोठा बोगदा ठरणार आहे.
महामार्गाची फेरआखणी
नागपूर-गोवा हा प्रस्तावित महामार्ग जवळपास ८०२ किलोमीटरचा आहे. हा महामार्ग १२ जिल्ह्यामधून जाणार आहे. यामध्ये १२ जिल्ह्यातील जवळपास २७ हजार हेक्टर जमिनीचे भूसंपादन केले जाणार आहे. हा महामार्ग रद्द करण्यात यावा, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे अनेक नेत्यांनी केली होती. तसेच या महामार्गामुळे शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान होणार असल्याची भावना अनेकांनी बोलून दखवली आहे. त्यामुळे नागरिकांचे हित लक्षात घेता हा प्रकल्प रद्द करण्याची मागणी करण्यात येत आहे. या महामार्गाच्या झालेल्या विरोधानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुठलाही प्रकल्प जनतेवर थोपणार नाही अथवा रेटून नेणार नाही असे आश्वासन दिले आहे. शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पात ज्या ठिकाणी विरोध आहे, त्याची फेरआखणी करता येईल का? याचाही विचार करीत आहोत. मात्र जनतेला विश्वासात घेतल्याशिवाय कुठलाही प्रकल्प पुढे नेणार नाही”, असं मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं आहे.
Facebook Comments Box