



केंद्रीयमंत्री आणि उत्तर मुंबई मतदारसंघाचे खासदार पियुष गोयल यांनी बोरिवलीतून कोकणात जाणारी रेल्वे सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. दोन दिवसांपूर्वी बोरिवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील राणे यांनी ही गाडी दिनांक २४ ऑगस्ट पासून सुरू केली जाणार असल्याचे जाहीर केले आहे . यासाठी कोकण विकास समितीने ईमेलद्वारे पियुष गोयल आणि केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले आहेत.
<script async src="https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6191739074070790" crossorigin="anonymous"></script> <!-- new display --> <ins class="adsbygoogle" style="display: block;" data-ad-client="ca-pub-6191739074070790" data-ad-slot="8284357421" data-ad-format="auto" data-full-width-responsive="true"></ins> <script> (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({}); </script>पाश्चिम उपनगरीय रेल्वे क्षेत्रातील प्रवाशांसाठी या गाडीने कोकणात जाण्यासाठी एक सोयीचा पर्याय उपलब्ध होणार आहे. मात्र या गाडीचे थांबे निश्चित करताना या क्षेत्रातील सर्व कोकणवासियांचा विचार करणे गरजेचे आहे. 10105/10106 दिवा सावंतवाडी एक्सप्रेसच्या च्या धर्तीवर या गाडीला थांबे मिळाल्यास या गाडीचा मोठा फायदा प्रवाशांना होऊ शकतो. गरज असलेल्या स्थानकांवर नंतर थांबे मिळविण्यास खूप अडचणीचे जाते, त्यामुळे या स्थानकांवर सुरवातीलाच थांबे देण्याचा विचार करावा आशयाचे निवेदन कोकण रेल्वे विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष जयवंत शंकर दरेकर यांनी रेल्वे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना ईमेलद्वारे दिले आहे.
<script async src="https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6191739074070790" crossorigin="anonymous"></script> <ins class="adsbygoogle" style="display: block;" data-ad-format="fluid" data-ad-layout-key="-64+c2-1f-2z+tg" data-ad-client="ca-pub-6191739074070790" data-ad-slot="4639791735"></ins> <script> (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({}); </script>10105/10106 दिवा सावंतवाडी एक्सप्रेसचे थांबे
- दिवा
- कळंबोली
- पनवेल जंक्शन
- आपटा
- जिते
- रोहे
- माणगांव
- गोरेगांव रोड
- वीर
- सापेवामणे
- करंजाड़ी
- विन्हेरे
- खेड़
- चिपळूण
- सावर्डा
- आरवली रोड
- संगमेश्वर रोड
- रत्नागिरी
- निवसर
- आडवली
- वेरावली
- विलवडे
- सौंदल
- राजापुर रोड
- खारेपाटण रोड
- वैभववाडी रोड
- अचिर्णे
- नांदगाव रोड
- कणकवली
- सिंधुदुर्ग
- कुडाळ
- झाराप
- सावंतवाडी रोड