मुंबई: यावर्षीपासून आपण कोकणात कोल्हापूर मार्गे जाऊया नको आपण कोकणातूनच जावा असे आवाहन समृद्ध कोकण संघटनेचे अध्यक्ष्य संजय यादवराव यांनी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना केले आहे.
कोकण महामार्ग काही ठिकाणी खराब असला तरी पूर्वीपेक्षा खूप चांगली परिस्थिती आहे.जिथे खराब आहे तिथे पर्यायी रस्ते आहे ते वापरले तर आपण आपल्या निसर्गभूमीतून निसर्गाचा आनंद घेत कोकणात जाऊ शकू. हायवे वरचे पेट्रोल पंप हॉटेल बाजारपेठा कोकणी चाकरमानी शिमग्याला गणपतीला येतात आणि त्यांच्या पाठबळावर असतात. हे सगळे व्यवसाय गेली आठ दहा वर्षे खूप अडचणीत आले आहेत. मात्र यावर्षीपासून रस्ता चांगला असल्यामुळे ही परिस्थिती बदलेल असा विश्वास आहे. पण यासाठी सर्व कोकण वासियांनी कोकणातूनच कोकणात आले पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. याबरोबरच त्यांनी चाकरमान्यांचा प्रवास सुखकर होण्यासाठी पर्यायी मार्गाबद्दलही माहिती दिली आहे. ती पुढीलप्रमाणे
कोकणात जाण्यासाठी मार्ग
मार्ग पहिला
मुंबई
मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे
खोपोली टोल नाका बाहेर पडा
पालीचा गणपती गावात शिरा
वेळेभागाड एमआयडीसी
निजामपूर
निजामपूर रायगडच्या दिशेने जा
दहा किलोमीटर मध्ये उजवीकडे एक फाटा आहे
या फाट्याने आपण माणगावच्या पुढे जातो. माणगाव मधील ट्रॅफिक टाळता येते.
लोणेरे ते संगमेश्वर चांगला रस्ता आहे
संगमेश्वर ते लांजा खराब रस्ता आहे
पण ज्यांना राजापूर आणि सिंधुदुर्गात जायचे आहे त्यांनी संगमेश्वरला लेफ्ट घेऊन देवरूखला जा. देवरुख वरून साखरपा
साखरप्यावरून दाभोळे
दाभोळ्यावरून भांबेड मार्गे वाटूळ
संगमेश्वर ते वाटुळ हा अतिशय देखणा सह्याद्री मधला रस्ता आहे एक खूप सुंदर अनुभव आहे.
वाटुळच्या पुढे सिंधुदुर्ग सगळीकडे चांगला रस्ता आहे.
ज्यांना रत्नागिरी मध्ये जायचे आहे त्यांना दोन रस्ते आहेत
1) संगमेश्वरच्या अलीकडे फुनगुस जाकादेवी मार्गे गणपतीपुळे आणि रत्नागिरी मध्ये जाता येईल
किंवा
2) संगमेश्वर च्या पुढे उजवीकडे उक्षी फाटा आहे उक्षी वरून जागा द्यावी आणि रत्नागिरीत जाता येईल हा रस्ता सुद्धा चांगला आहे.
त्यामुळे हे रस्ते वापरून आपल्याला कोकणात कुठेच अडचण न येता खूप चांगल्या रस्त्याने आपल्या गावी जाता येईल.
Facebook Comments Box