Konkan Railway Updates: यावर्षी गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार्या गणेश भक्तांसाठी एक खुशखबर आहे. गणेशोत्सवादरम्यान कोकणात जाण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने कोकण रेल्वे मार्गावर एक अनारक्षित विशेष गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ज्या चाकरमान्यांना गावी जाण्यासाठी आरक्षित तिकिटे भेटली नाहीत त्यांना एक चांगला पर्याय उपलब्ध झाला आहे. या गाडीची माहिती खालीलप्रमाणे
०११०३/०११०४ सिएसएमटी – कुडाळ – सिएसएमटी विशेष
गाडी क्रमांक ०११०३ विशेष गाडी दिनांक ०४ सप्टेंबर आणि ०६ सप्टेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई या स्थानकावरून दुपारी ०३.१५ वाजता सुटेल आणि दुसर्या दिवशी पहाटे ३.३० वाजता कुडाळ येथे पोहोचेल.
गाडी क्रमांक ०११०४ विशेष गाडी दिनांक ०५ सप्टेंबर आणि ०७ सप्टेंबर रोजी कुडाळ या स्थानकावरून पहाटे ०४.३० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी संध्याकाळी १६.४० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे पोहोचेल.
थांबे: दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, कामथे, सावर्डा आरवली रोड, संगमेश्वर , रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर, वैभववाडी, नांदगाव, कणकवली आणि सिंधुदुर्ग
डब्यांची संरचना: जनरल – १४, स्लीपर (अनारक्षित) – ०४, एसएलआर – ०२ एकूण २० डबे
Vision Abroad