कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडीची मागणी.
Follow us on



सिंधुदुर्ग: काल रेल्वे बोर्डाने ०११०३/०११०४ मुंबई – कुडाळ – मुंबई अनारक्षित गणपती विशेष गाडी सोडण्याचा निर्णय घेतला, वास्तविक बघता गणेशोत्सव हा पूर्ण कोकणचा मोठा उत्सव असल्याकारणाने संपूर्ण कोकणात मुंबईकर चाकरमानी हे लाखोच्या संख्येने येत असतात, असे असताना रेल्वे प्रशासनाने आधीच गुजरात वरून सुटणाऱ्या गाड्या ह्या कुडाळ पर्यंत चालवण्याचा निर्णय घेतला, एकीकडे कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडी, सावंतवाडी येथील अपूर्ण असणारे रेल्वे चे टर्मिनस मार्गी लावण्यासाठी जोरदार प्रयत्न करत असताना रेल्वे प्रशासन मात्र गाड्या ह्या कुडाळ पर्यंत सोडून सावंतवाडी तालुका, शिरोडा – तुळस पंचक्रोशी, आणि दोडामार्ग तालुका वासियांना वाऱ्यावर सोडत असल्याचे चित्र आहे.
सदर ची गाडी ही मुंबईहून येताना पहाटे ३.३० वाजता कुडाळ ला पोचेल आणि लगेच ४.३० वाजता तिथून मुंबई करिता रवाना होणार आहे.
असे असताना फक्त २० मिनिटे अंतर असणाऱ्या सावंतवाडी स्थानकावर ही गाडी आणल्यास या गाडीचा फायदा सावंतवाडीवासियांना देखील मिळेल आणि लोकांची ऐन रात्रीच्या वेळी परवड देखील होणार नाही.
त्यामुळे ही अनारक्षित गाडी सावंतवाडी पर्यंत सोडावी ही मागणी जोर धरू लागली आहे.
🚂सिएसएमटी – कुडाळ अनारक्षित विशेष गाडी सावंतवाडी किंवा मडुरेपर्यंत विस्तारित करण्याची मागणी – Kokanai
✴️कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडीची मागणी.
सविस्तर वृत्त- https://t.co/cIpohPauPB…@KonkanRailway@Central_Railway pic.twitter.com/01aTxiGzEF
— को – बातम्या मराठीत (@kokanai21) September 4, 2024