Konkan Railway Updates: कोकणात गावी जाण्यासाठी चाकरमान्यांची पहिली पसंदी असलेल्या रेल्वेने यावर्षी चाकरमान्यांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी खूप चांगली दक्षता घेतली आहे. कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या नियमित गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाल्याने यावर्षी चांगल्या संख्येत अतिरिक्त गाड्या चालविण्यात आल्या आहेत. मात्र या गाड्यांचेही आरक्षण फुल्ल झाल्याने ज्या प्रवाशांना आर्कषित तिकिटे भेटली नाहीत अशा प्रवाशांच्या सोयीकरिता अनारक्षित गाड्या चालविण्यात आल्या आहेत. या अनारक्षित गाड्यांत अजून एका गाडीची भर आहे. या गाडीची माहिती खालीलप्रमाणे
०११८३ / ०११८४ सिएसएमटी – कुडाळ – सिएसएमटी अनारक्षित विशेष
गाडी क्रमांक ०११८३ विशेष गाडी दिनांक ०६ सप्टेंबर (शुक्रवारी) रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई या स्थानकावरून रात्री २२.३० वाजता सुटेल आणि दुसर्या दिवशी सकाळी ९.३० वाजता कुडाळ येथे पोहोचेल.
गाडी क्रमांक ०११८४ विशेष गाडी दिनांक ०७ सप्टेंबर (शनिवार) रोजी कुडाळ या स्थानकावरून सकाळी १०.३० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री २१.५५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे पोहोचेल.
थांबे: दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर, रत्नागिरी, आडवली, राजापूर, वैभववाडी,कणकवली आणि सिंधुदुर्ग
डब्यांची संरचना: जनरल – ०२, स्लीपर (अनारक्षित) – १४, एसएलआर – ०२ एकूण १८ डबे
विशेष म्हणजे या गाडीला १४ स्लीपर डबे जोडण्यात येणार असून ते पूर्णपणे अनारक्षित असणार आहेत. त्यामुळे चाकरमान्यांना जनरल च्या तिकिटामध्ये स्लीपर कोच मधून प्रवास करता येणार आहे.
Facebook Comments Box
Vision Abroad