Konkan Railway: धक्कादायक: कन्फर्म तिकिटांच्या सीटच गायब; रेल्वेचा भोंगळ कारभार समोर

   Follow us on        
कोकणात गणेश चतुर्थीस गावी जाण्यासाठी सर्वात सोयीचा आणि परवडणारा पर्याय म्हणून मुंबईचा चाकरमानी कोकण रेल्वेला प्राधान्य देतो. जायची आणि यायची कन्फर्म आरक्षित तिकिटे भेटली की तो निर्धास्त होतो. तीही न भेटल्यास दलालांकडून दुप्पट रक्कमेनेही ती विकत घेतो. मात्र गाडी पकडल्यावर याच कन्फर्म तिकिटांवर असलेला सीट नंबरच त्या डब्यातून गायब असल्यास?
हो, असे प्रकार रेल्वे प्रशासनाकडून घडत आहेत. खासकरून कोकण रेल्वे मार्गावर नियमित धावणाऱ्या जनशताब्दी एक्सप्रेसच्या प्रवाशांसोबत हे प्रकार घडत आहेत. कणकवली ते मुंबई १४ सप्टेंबर रोजी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसोबत हा प्रकार घडला आहे. या प्रवाशांकडे १२०५२ जनशताब्दी एक्सपेसची D5 या डब्याची कणकवली ते दादर सहा कन्फर्म तिकिटे होती. मात्र जेव्हा ते गाडीत चढले तेव्हा त्यांच्या सीटच उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले. त्यांच्याकडील तिकिटावर ११४,११५,११६,११७,११८ आणि ११९ असे सीट नंबर होते. मात्र या डब्यात शेवटचा सीट नंबर १०६ होता. पीएनआर चेक केले असता या तिकिट्स रद्द दाखवत होत्या. या प्रकारामुळे या  प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला आहे.
आरक्षण करताना कन्फर्म असणारी तिकिटे चार्ट तयार होताना रद्द होत आहेत. त्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. जनशताब्दी एक्सपेस गाडीच्या सेकंड चेअर क्लासचे आरक्षण करतेवेळी डब्यांमधील १२० सीटप्रमाणे तिकिटे उपलब्ध करून दिली जातात. मात्र काही वेळा १२० सीटचा डबा उपलब्ध नसल्याने त्याजागी १०६ सीट असलेला डबा जोडला जातो आणि १४ तिकिटे रद्द केली जातात. त्यामुळे हे सीट नंबर आलेल्या प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

Loading

Facebook Comments Box






मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search