मुंबई: मालवण राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नव्याने उभारला जाणार आहे. या निविदेचा तपशील जाहीर झाला आहे. नवा पुतळा हा ६० फुटांचा असणार आहे. हा पुतळा पुतळा नव्याने उभारण्यासाठी निविदा काढण्यात आली आहे. शिवरायांच्या पुतळ्याची पायाच्या अंगठ्यापासून ते डोक्यापर्यंत उंची ६० फूट असेल असे निविदेच्या तपशीलात म्हटले आहे. या पुतळ्याच्या उभारणीसाठी २० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या धर्तीवर उभारणार पुतळा
निविदेच्या अटी,शर्तींमध्ये या पुतळ्याची उभारणी स्टॅच्यू ऑफ युनिटी्च्या धर्तीवर करण्यात येणार असल्याचे म्हटले असून पुतळ्याची उभारणीवर ही IIT मुंबईची तज्ज्ञ मंडळी लक्ष ठेवणार आहेत. या पुतळ्याच्या उभारणीसाठी 6 महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. पुतळ्यासाठी एक समिती तयार करण्यात आली असून या समितीच्या प्रमुख सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर असणार आहेत. त्यांच्याशिवाय IIT मुंबईची तज्ज्ञ मंडळी या समितीत असणार आहेत.
निविदेत काय म्हटले आहे?
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी शासनाने पुतळ्यासाठीची निविदा प्रसिद्ध केली आहे. शिवरायांच्या पुतळ्याची रचना, अभियांत्रिकी, बांधकाम, उभारणी, संचलन आणि देखभाल-दुरुस्ती यासाठी ही निविदा आहे.हा पुतळा 60 फुटी असणार असून तो उभारण्यासाठी सहा महिन्यांची मुदत देण्यात आलेली आहे.
Vision Abroad