रत्नागिरी, दि. २९ सप्टें: गणपतीपुळे येथे समुद्रात आज रविवारी (दि.29) सायंकाळी 5.15 च्या सुमारास जेएसडब्ल्यू कंपनीच्या पोर्टवरील तीन कर्मचार्यांपैकी दोघांचा बुडून मृत्यू झाला. तर एकाला वाचवण्यात जीव रक्षकांना यश आले. प्रदीप कुमार (30,मुळ रा.ओडीसा) आणि महंमद युसूफ (29,मुळ रा.उत्तराखंड) अशी बुडून मृत्यू झालेल्या तरूणांची नावे आहेत. तर डाकुआ टुकुना (30,रा.वेस्ट बंगाल) याला वाचवण्यात यश आले.
याबाबात सविस्तर वृत्त असे कि जेएसडब्ल्यू कंपनीच्या पोर्टचे तीन कर्मचारी रविवारी गणपतीपुळे येथे फिरायला आले होेते. ते समुद्रात आंघोळ करण्यासाठी गेले असताना हे तिघेही लाटेबरोबर पाण्यात ओढले गेले. त्यांनी आरडोओरडा करण्यास सुरुवात केली. त्यांचा आवाज ऐकून समुद्रकिनारी असलेले जीवरक्षक अनिकेत राजवाडकर आणि सुलभ चालक निखिल सुर्वे यांनी समुद्रात उड्या घेत तिघांनाही समुद्रकिनारी आणले परंतु, यातील दोघांच्या नाकातोंडात पाणी गेल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. याबाबत माहिती मिळताच जयगड पोलिसानी घटनास्थळी धाव घेत तिघांनाही मालगुंड प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले मात्र या तिघांपैकी दोघांचा या दरम्यान मृत्यू झाला.
![]()
Facebook Comments Box
Related posts:
Malvan: ८३ फूट उंच, 23 फूट लांबीची तलवार! राजकोट येथील शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण
कोकण
Konkan Railway: आरक्षणाची झंझट नाही! होळीसाठी कोकण रेल्वे मार्गावर धावणार 'अनारक्षित विशेष' गाड्या
कोकण
Konkan Expressway: मुंबई ते गोवा प्रवास ६ तासांवर आणणारा 'कोकण द्रुतगती महामार्ग' नेमका कसा असणार?
कोकण


