पालघर दि. ३० सप्टें. २०२४: पालघर जिल्ह्यातील शिरगाव हा ऐतिहासिक किल्ला राज्य संरक्षक स्मारक म्हणून घोषित करण्यात आला आहे. या किल्ल्याच्या जतन व संवर्धन कामाचे आज सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते व्हर्च्युअल पद्धतीने भूमिपूजन करण्यात आले.
यासाठी सरकारच्या वतीने सुमारे ७ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून देखील निधी मंजूर करण्यात आला आहे. हे काम पूर्णतः सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे PWD करण्यात करण्यात येत आहे. याप्रसंगी पालघर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम, माजी खासदार राजेंद्र गावित, जिल्हाधिकारी गोविंद बोडके, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास व्हनमाने, भानुदास पालवे, कुंदन संख्ये आदी मान्यवर उपस्थित होते.
शिरगाव किल्ला पालघर तालुक्यातील समुद्रकाठच्या बाजूला स्थित आहे.या किल्ल्याचा उपयोग छत्रपती शिवाजी महाराज यांनी अरबी समुद्रातुन येणाऱ्या शत्रुवरती लक्ष ठेवण्यासाठी केला होता. या प्राचीन किल्ल्याचे आता अवशेष शिल्लक आहेत. मराठ्यांच्या आधी पोर्तुगीजांचे या किल्ल्यावरती वर्चस्व होते.१८१८ मध्ये ब्रिटिशांनी मराठ्यांकडून हा किल्ला मिळविला . हा किल्ला २०० फूट उंच आणि १५० फूट हून अधिक लांबीचा आहे. पोर्तुगीजांनी हा किल्ला नूतनीकरण करून आणि त्याच्या क्षेत्रात वाढ करत असतांना मूळ वीट आणि लाल दगड बांधकाम अखंड ठेवले आहे . या किल्ल्याच्या उत्तर पश्चिम भागात पाच पाय तोफ युद्ध इतिहास चिन्हांकित आहे .स्वच्छता आणि देखण्या भोवतालचा परिसरामुळे नियमित पर्यटक व्यतिरिक्त इतिहासकारांना हा किल्ला नेहमीच आकर्षित करत आला आहे.सर्वात रोमांचक म्हणजे पाम वृक्षाचे झाड आहे ज्याला सहा ते सात शाखा आहेत . एक दुर्मिळता अशी आहे कि शिरगाव किल्ला तटबंदीचा आहे आणि भिंती चांगल्या स्थितीत आहेत. आता हा किल्ला ऐतिहासिक किल्ला राज्य संरक्षक स्मारक म्हणून घोषित करण्यात आल्याने त्याचे जतन करण्यात येणार आहे.
Vision Abroad