मालवण आगाराला १० मिडी बस उपलब्ध करून न दिल्यास आमरण उपोषणाचा ईशारा

   Follow us on        
मालवण: मालवण आगाराला ६ मोठ्या आणि ४ मिनी बस दिवाळीपूर्वी उपलब्ध करून न दिल्यास मालवण आगारासमोर आमरण उपोषणाला बसण्याचा  ईशारा येथील सामाजिक कार्यकर्ते सुरेश बापर्डेकर यांनी सरकारला दिला आहे.
मिडी बस करिता मा. एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री आणि मा.देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री यांना १८ जांने २०२३ यांना पत्र दिल्यानंतर त्यांनी अहवाल मागितला तो शासन जवळ महाव्यवस्थापक कार्यालयातून मंजुरीला पाठविलं तो  प्रस्ताव मंजुरी येऊनही प्रशासन खरेदी अगर भाडे तत्वावर घेत नसल्याच्या निषेधार्थ आमरण उपोषणाचा मार्ग पत्करावा लागलाआहे.मालवणतालुक्यातील निसर्गरम्य पर्यटन दुष्टया विकसित तारकर्ली गावी पर्यटन असल्याने गावात गाड्यांची आणि पर्यटकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ नेहमीच चालू असते अशावेळी वाहतुकीची कोंडी होत असल्याने पूर्वी मिडी बस या मार्गावर दोन चालू होत्या पण कोरोना काळात बंद ठेवल्याने खराब झाल्याने मोठी बस पूर्ण देवबाग पर्यंत पोहोचत नाहीत  काही बसेस मध्येच तारकर्ली येथे वळून वापस घेऊन जावे लागते किंव्हा अचानक फेऱ्या बंद करावे लागतात.अशावेळी गावातील प्रवाशी नागरिक तसेच गावातील विद्यार्थी शाळा आणि कॉलेज इतर कोर्सेस याकरिता प्रवाशी आणि नागरिक मालवणला इतर गावांनी ये जा करीत असतात. त्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो.यापूर्वी या मार्गावर मिडी बस मालवण हून तर दुसरी देवबाग हून सोडली जात होत्या.तरी जर नवीन मिडी बस आल्यास मुलांच्या सोईकरिता मालवण आगारातून सकाळी व सायंकाळी चार फेऱ्या मुलांच्या वेळेनुसार बाजारपेठ मार्गे सोडून सर्वांची होणारी गैरसोय दूर होईल.अशी मागणी तारकर्ली चे सामाजिक कार्यकर्ते सुरेश बापर्डेकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
 प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात पुढे सुरेश बापर्डेकर म्हणाले की महाव्यवस्थापक आणि वरिष्ठ प्रशासन यांच्या निष्काळजी कामामुळे मालवण आगार समोर उपोषणाला बसावे लागत आहे.मालवण आगारातुन ये जा फे-या काही तारकर्ली व देवबाग आहेत. परतु त्या अपु-या आहेत. आणखी अशातच आपंनाकडून चार मिडी बस मिळाल्या तर या तारकर्लीच्या आजुबाजुच्या गावातील भूतनाथ, देवली, दत्तमंदिर, वायरी, काळेथर, तारकर्ली आणि विठ्ठल मंदिर देवबाग पर्यतच्या प्रवाशी व शाळेतील मुलांना सकाळी गावातुन मालवणला शाळेत जाते वेळी आणि मालवणहून गावाकडे जर एस.टी च्या फेऱ्या पूर्वी प्रमाणे देवबाग आणि तारकर्ली येथून मालवण आणि मालवणहून तारकर्ली व देवबाग अशा मिडी बसेस सोडल्या तर नक्कीच जाता येता सर्व प्रवाशांना ताटकळत उन्ह – पाऊस झेलत रहायला नको. या फेऱ्या बाजारपेठ मार्गे ये-जा करत असतील तर प्रवाशाबरोबर, शाळा कॉलेज करिता ये-जा करणा-यांना या फे-यामुळे शाळा कॉलेजातील मुले आणि प्रवाशी यांना मोठ्या प्रमाणात फायदा होईल. आणि एस टी महामंडळाला उत्पन्नात मोठ्या प्रमाणात वाढ होईल. तर कित्येकवेळा देवबागहुन येणा-या एस.टी फे-या भरलेल्या असल्याने या मधील गावातील बस जाग्यावर भरुन येत असल्याने मधल्या गावांनी बस थांबवली जात नसल्याने शाळा कॉलेजच्या मुलाना जाण्याकरिता उशीर होतो अगर नाहक शाळा कॉलेजचा खाडा होऊन त्यांचं नुकसान होत. तसेच शाळा कॉलेज मधील मुलांना सध्याचा अभ्यास व त्यांचे दप्तर पाहीले तर बऱ्याच दुर वरून मालवण स्टँडवर येणे अगर भरड वरून आपल्या शाळा कॉलेजला जाणे दप्तराच्या ये जा करणे मुलांना होण्या-या  गैरसोईचा पुरेपुर विचार होऊन मालवण आगार व्यवस्थापक  मालवणला मिडी बस हव्यात याबाबत उत्सुक आहेत.
सध्या मालवण आगारातून मोठी बस सोडली जाते परंतु कित्येक वेळा काही रस्ता अरुंद आणि पर्यटक गाड्या यामुळे बस प्रवाशी ,विद्यार्थी असताना देखील एस टी सोडली जात नाही.सीझनला मिडी बस नसल्याने या मार्गावर पर्यटकांची आणि गाड्यांची वर्दळ वाढली यामुळे  वाहतुकीची कोंडी होऊन अपुऱ्या बसेस ये जा कराव्या लागतात आणि प्रवाशी विद्यार्थी यांना मनस्ताप होतो.त्यात मोठ्या बसेसची आगारात रुट फेऱ्या पेक्षा गाड्या कमी आहेत. असे वारोंवार  वाहतूक कंट्रोल वर ऐकायला मिळतात.आम्हीं मागणी करून थकलो अशी उत्तरे मिळतात मग नागरिकांनी करायचं काय.
श्री सुरेश बापर्डेकर यांनी पुढे म्हणाले की मालवण आगाराला रुट जादा आणि मोडक्या तोडक्या बसेस कमी आहेत. तरी आपण त्वरित वरिष्ठांच्या पत्रानुसार त्वरित मीटिंग घेऊन त्यात विषय मांडून लवकरात लवकर मालवण आगाराला चार मिडी चांगल्या बस  आणि सहा मोठ्या गाड्या खरेदी करून पाठविणे जेणेकरून इतर गावातील आणि तारकर्ली देवबाग येथील प्रवाशी नागरिक विद्यार्थी यांचे होणारी गैरसोय दूर होण्यास आपल्याकडून चालना मिळेल. तरी संबधित परिवहन मंत्रालय जवळ मंजुरी करिता पाठविलेली फाईल मंजुरी होऊन आलेली असताना सुद्या मा. महाव्यवस्थापक ,उपाध्यक्ष  एस टी परिवहन महामंडळ मुंबई यांच्या कडून विलंब होत आहे. तसेच संबधित मां उपमुख्यमंत्री आणि राज्याचे परिवहन मंत्री यांच्याकडून मागितलेल्या १२५०  मिडी बस नवीन खरेदी अगर भाडेतत्वावर घेण्यास अनुमती मिळाली असताना देखील वेळकाढू आणि आम्हाला प्रवाशांची गैरसोय झाली तरी चालेल पण बस आनायचेच नाही.असे दिसून येते आहे.त्यामुळे प्रवाशी नागरिक विद्यार्थी वर्गात संतापाची लाट उसळली आहे.
जर पत्र मिळाल्यापासून दिवाळी पूर्वी चार मिडी बस आणि सहा मोठ्या गाड्या मालवण आगाराला  दिनांक २० ऑक्टोंबर २०२४ पर्यंत मिळाले नाहीत तर एस टी वरिष्ठ प्रशासन मुंबई यांच्या विरुद्ध मी स्वतः,ग्रामस्थ, विद्यार्थी दिनांक २५  ऑक्टोंबर २०२४ रोजी  मालवण आगार समोर आमरण उपोषणाला बसणार आहे याची कल्पना  मां. महाव्यवस्थापक वाहतूक मुंबई,विभाग नियंत्रक सिंधुदुर्ग यांना फॅक्स द्वारे आणि श्री अनिरुद्ध सुर्यवंशी आगार व्यवस्थापक मालवण यांना प्रत्यक्ष निवेदन देण्यात आले. यावेळी सुरेश  बापर्डेकर यांच्या समवेत देवबाग तारकर्ली चे रामचंद्र चोपडेकर ,किशोर कुबल बबन मांजरेकर हे उपस्थित होते.

Loading

Facebook Comments Box






मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search