मुंबई:मराठी भाषेला अलीकडेच अभिजात भाषेचा दर्जा भेटला असताना तिची खुद्द महाराष्ट्रातच अवहेलना होण्याचे प्रकार घडताना दिसत आहे. असाच एक प्रकार मुंबई उपनगरीय रेल्वेच्या नालासोपारा स्थानकावर घडला आहे.
एका हिंदी भाषिक टीसीने एका प्रवाशांकडून तो प्रवासी यापुढे मराठी भाषेचा आग्रह धरणार नाही असे लिहून घेतल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकारची एक पोस्ट सोशल मीडियावर प्रमाणावर व्हायरल होत आहे. अमित पाटील या नावाच्या प्रवाशाला नालासोपारा रेल्वेस्थानकावर कर्तव्यावर असलेल्या रितेश मोरया नावाच्या एका टीसीने तिकीट दाखवण्यास सांगितले. मात्र त्या प्रवाशाने आपल्याला हिंदी भाषा समजत नसल्याने मराठीत बोला असा आग्रह धरला. मात्र त्या तिकीट तपासनीसाने मराठीत बोलण्यास नकार दिला आणि बाचाबाची केली, एवढेच नव्हे तर त्याने तेथे कर्तव्यावर असलेल्या रेल्वे पोलिसांच्या मदतीने त्या प्रवाशाकडून यापुढे तो मराठीचा आग्रह धरणार नाही असे लिहून घेतले.
काय लिहून घेतले?
“नाव- अमित पाटील…..रितेश मोरया मला नालासोपारा स्टेशन वर भेटले असता मला तिकीट दाखवायला सांगितले. मी त्यांना बोललो कि मला स्थानिक भाषा येते त्यामुळे माझ्याशी मराठीत बोला, हिंदी मला फारशी येत नाही. तर त्यांनी मराठी भाषा बोलण्यास नकार दिला. यापुढे मी मराठी भाषा बोलण्यास प्रेशर देणार नाही.”
नालासोपारा स्थानकावर @WesternRly च्या तिकीट तपासनीस रितेश मोर्याची भाषा एक ‘स्थानिक प्रवाशाला’ समजली नाही, मराठी बोला म्हटल्यावर मोर्याने गुंडागर्दी केली, पोलीस बोलावले धमकावून मराठीची मागणी करणार नाही लिहून घेतले
मराठी राज्यात दंडेलशाही का? @drmbct@grpmumbai @AshwiniVaishnaw— मराठी एकीकरण समिती – Marathi Ekikaran Samiti (@ekikaranmarathi) November 3, 2024
Facebook Comments Box