६ नोव्हेंबर पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग 
  • तिथि-पंचमी – 24:43:20 पर्यंत
  • नक्षत्र-मूळ – 11:00:58 पर्यंत
  • करण-भाव – 12:34:57 पर्यंत, बालव – 24:43:20 पर्यंत
  • पक्ष-शुक्ल
  • योग-सुकर्मा – 10:50:12 पर्यंत
  • वार-बुधवार
  • सूर्योदय- 06:43
  • सूर्यास्त- 18:01
  • चन्द्र-राशि-धनु
  • चंद्रोदय- 10:52:00
  • चंद्रास्त- 21:49:59
  • ऋतु- हेमंत


दिनविशेष
महत्त्वाच्या घटना:
  • १८६०: अब्राहम लिंकन अमेरिकेचे १६ वे अध्यक्ष म्हणून निवडून आले.
  • १८८८: महात्मा गांधींनी कायद्याच्या अभ्यासासाठी लंडन येथे प्रवेश घेतला.
  • १९१३: दक्षिण आफ्रिकेत भारतीय वंशाच्या खाणकामगारांच्या मोर्चाचे नेतृत्त्व केल्याबद्दल महात्मा गांधींना अटक करण्यात आली.
  • १९५४: मुंबई राज्यात मुंबई वीज मंडळ या दिवशी स्थापन करण्यात आले.
  • १९९६: ’अर्जेंटिनाचे गांधी’ म्हणून ओळखले जाणारे प्रा. अडोल्फो डी. ओबिए्ता यांना पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या हस्ते ’जमनालाल बजाज आंतरराष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान
  • १९९९: विकसनशील देशांना जैवतंत्रज्ञानाचा लाभ उपलब्ध करुन दिल्याबद्दल भारताचे वैज्ञानिक डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांना ’युनेस्को गांधी सुवर्णपदक’ जाहीर
  • २००१: संरक्षण संशोधन व विकास संस्थेचे (DRDO) महासंचालक डॉ. वासुदेव अत्रे यांना प्रतिष्ठेचा ‘वाय. नायडुम्मा स्मृती पुरस्कार‘ प्रदान करण्यात आला. युद्धनौकेवरुन युद्धनौकेवर मारा करणारे ’धनुष’ हे संपूर्ण भारतीय बनावटीचे क्षेपणास्त्र विकसित करण्यात डॉ. अत्रे यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली.
  • २०१२: बराक ओबामा आणि जो बिडेन यांची दुसर्‍यांदा अनुक्रमे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि उपराष्ट्राध्यक्ष म्हणून निवड झाली.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १८८०: निसान मोटर कंपनीचे संस्थापक योशूसुका अकावा यांचा जन्म. (मृत्यू: १३ फेब्रुवारी १९६७)
  • १८६१: बास्केटबॉल खेळाचे निर्माते जेम्स नास्मिथ यांचा जन्म. (मृत्यू: २८ नोव्हेंबर १९३९)
  • १८१४: अ‍ॅडोल्फ सॅक्स – सॅक्सोफोन या वाद्याचे जनक (मृत्यू: ४ फेब्रुवारी १८९४)
  • १८३९: भगवादास इंद्रजी – प्राच्यविद्या संशोधक, पहिले भारतीय पुरतत्त्वज्ञ (मृत्यू: ? ? ????)
  • १८९०: बळवंत गणेश खापर्डे – कविभूषण, दादासाहेब खापर्डे यांचे सुपुत्र (मृत्यू: ? ? ????)
  • १९०१: श्रीकृष्ण के. क्षीरसागर – लेखक, विचारवंत, समीक्षक (मृत्यू: २९ एप्रिल १९८०)
  • १९१५: दिनकर द. पाटील – चित्रपट दिग्दर्शक, पटकथा व संवाद लेखक (मृत्यू: २१ मार्च २००५)
  • १९२६: झिग झॅगलर – अमेरिकन लेखक (मृत्यू: २८ नोव्हेंबर २०१२)
  • १९६८: याहू चे संस्थापक यारी यांग यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १७६१: औरंगजेबाच्या बलाढ्य फौजेशी टक्‍कर देताना मराठेशाही वाचवणार्‍या महाराणी ताराबाई (मराठा साम्राज्यातील ४ थी छत्रपती) यांचे निधन (जन्म: ? ? १६७५)
  • १८३६: चार्ल्स (दहावा) – फ्रान्सचा राजा (जन्म: ९ आक्टोबर १७५७)
  • १९८५: हरी जरीवाला ऊर्फ ’संजीव कुमार’ – रुपेरी चित्रसृष्टी निखळ अभिनयाच्या जोरावर गाजवणारे कसदार अभिनेते (जन्म: ९ जुलै १९३८)
  • १९८७: प्रा. भालचंद्र वामन तथा ’भालबा’ केळकर – लेखक व अभिनेते (जन्म: २३ सप्टेंबर १९२०)
  • १९९२: ’गंधर्व भूषण’ जयराम शिलेदार (जन्म: ६ डिसेंबर १९१६)
  • १९९८: अनंतराव कुलकर्णी – साहित्याची उत्तम जाण असलेले प्रकाशक, ’कॉन्टिनेन्टल प्रकाशन’चे संस्थापक (जन्म: १९ सप्टेंबर १९१७)
  • २००२: स्वत:च्या सुवाच्च अक्षरात हिंदीत राज्यघटना लिहिणारे वसंत कृष्ण वैद्य यांचे निधन.
  • २०१०: पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सिद्धार्थ शंकर रे यांचे निधन. (जन्म: २० ऑक्टोबर १९२०)
  • २०१३: भारतीय शेफ तरला दलाल यांचे निधन. (जन्म: ४ जुन १९३६)

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

Loading

Facebook Comments Box






मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search