Indian Raiwlays: रेल्वे प्रवासासाठी सर्वसामान्य जनतेची वाढती मागणी आणि गरज लक्षात घेऊन रेल्वेने काही निर्णय घेऊन त्यांची अंबलबजावणी करायला सुरुवात केलेली आहे. त्याचाच एक भाग म्हणून रेल्वेने गेल्या तीन महिन्यांत विविध गाड्यांमध्ये साधारण श्रेणीचे (GS) सुमारे 600 नवीन अतिरिक्त डबे जोडले आहेत. हे सर्व डबे नियमित गाड्यांमध्ये जोडण्यात आले आहेत. तर नोव्हेंबर 2024 अखेपर्यंत , सुमारे 370 नियमित गाड्यांमध्ये GS श्रेणीचे असे एक हजाराहून अधिक डबे जोडले जातील असे भारतीय रेल्वे प्रशासनाने जाहीर केले आहे.
रेल्वेच्या ताफ्यात हे नवीन GS डबे जोडल्यामुळे दररोज सुमारे एक लाख प्रवाशांना फायदा होणार आहे. याशिवाय येत्या दोन वर्षांत रेल्वेच्या ताफ्यात मोठ्या प्रमाणात नॉन-एसी क्लासचे डबे समाविष्ट करण्याचे काम वेगाने सुरू आहे. रेल्वे बोर्डाने सामान्य वर्गातील रेल्वे प्रवाशांसाठी नवीन सुविधांची सविस्तर माहिती दिली आहे. भारतीय रेल्वे बोर्डचे कार्यकारी संचालक (माहिती आणि प्रचार) श्री दिलीप कुमार म्हणाले की, सामान्य वर्गातील प्रवासी हे रेल्वेच्या सर्वोच्च प्राधान्यांपैकी एक आहेत. भारतीय रेल्वे सर्व श्रेणीतील प्रवाशांना जास्तीत जास्त सुविधा देण्यासाठी विविध दिशेने काम करत आहे. याअंतर्गत जुलै ते नोव्हेंबर या तीन महिन्यांत एकूण 1000 नवीन GS डबे गाड्यांना जोडले जातील. तसेच, हे नव्याने बांधलेले डबे 370 नियमित गाड्यांमध्ये जोडण्यात आले आहेत. दररोज हजारो अतिरिक्त प्रवासी याचा लाभ घेत आहेत. या डब्यांच्या समावेशामुळे दररोज सुमारे एक लाख अतिरिक्त प्रवाशांना फायदा होणार आहे.
कार्यकारी संचालक (I&P) म्हणाले की, सामान्य वर्गातील प्रवाशांच्या सुविधा लक्षात घेऊन नवीन GS कोच बांधण्याचे काम वेगाने सुरू आहे. ते म्हणाले की, येत्या दोन वर्षांत अशा 10 हजारांहून अधिक नॉन-एसी जनरल क्लासचे जीएस डबे रेल्वेच्या ताफ्यात जोडले जातील. यातील सहा हजारांहून अधिक जीएस कोच असतील, तर उर्वरित डबे स्लीपर क्लासचे असतील. एवढ्या मोठ्या संख्येने नॉन एसी डब्यांच्या समावेशामुळे सामान्य वर्गातील सुमारे आठ लाख अतिरिक्त प्रवासी दररोज रेल्वेने प्रवास करू शकतील. हे सर्व नव्याने बांधलेले नॉन एसी कोच एलएचबी प्रकारचे असतील. प्रवास आरामदायी आणि सोयीस्कर बनवण्यासोबतच तो सुरक्षित आणि जलद होण्यासही मदत होईल. पारंपारिक ICF रेल्वे कोचच्या तुलनेत, हे नवीन LHB डबे तुलनेने हलके आणि मजबूत आहेत. अपघात झाल्यास या डब्यांचे नुकसानही अत्यल्प असेल.
मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ.स्वप्नील निला यांनी सांगितले की, CR 42 गाड्यांमध्ये अतिरिक्त 90 GS कोच जोडण्यासाठी सज्ज आहे ज्यामुळे दररोज 90,000 हून अधिक प्रवाशांना फायदा होईल. प्रवाशांची वाढती मागणी पाहता यामुळे रेल्वे प्रवाशांना मोठा फरक पडेल.
Facebook Comments Box
हेही वाचा - Pandharpur Special Train: आषाढी एकादशी निमित्त गोव्याहून पंढरपूरसाठी विशेष रेल्वे धावणार
Related posts:
"कोकण रेल्वेला २ वंदे भारत एक्सप्रेससह एकूण ७ नव्या गाड्या दिल्यात; मात्र विलिनीकरण करण्याचे काम.......
कोकण
New Traffic Rules Fine: ट्रॅफिक नियम मोडणे आता परवडणार नाही... दंडाचे नवीन दर जाहीर..
देश
Vande Bharat Sleeper: १८० किमी प्रतितास वेग, एकूण ३ श्रेणी आणि ८२३ प्रवासी क्षमता...लवकरच सुरु होणार...
देश