देवरुख: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून दिनांक 6 डिसेंबर 2024 रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि कोकण विकास संघर्ष समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आज आरोग्य शिबीर आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे नेतृत्व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आदरणीय रोहित तांबे यांनी केले आहे.
कार्यक्रमाचे आयोजन 6 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या शेजारील सभापती निवास मध्ये, देवरुख पोलीस स्टेशनसमोर करण्यात आले असून दुपारी 3 वाजेपर्यंत चालणार आहे. या शिबिरामध्ये नागरिकांना मोफत आरोग्य तपासणीसह विविध वैद्यकीय सेवांचा लाभ घेता येणार आहे. जिल्ह्या रुग्णालयात रुग्णांना रक्ताचा तुटवता भासत असून रक्तदान शिबिराद्वारे समाजहितासाठी रक्तदानाची चळवळ पुढे नेण्याचा उद्देश ठेवण्यात आला आहे.
या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, अनेकांनी आरोग्य तपासणीसाठी आणि रक्तदानासाठी नोंदणी केली आहे. “समाजासाठी ही एक छोटी सेवा आहे जी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन करणारी आहे,” असे रोहित तांबे यांनी सांगितले.
शिबिरात सहभागी होण्यासाठी आणि अधिक माहिती घेण्यासाठी नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. अशा उपक्रमांमुळे समाजातील आरोग्यविषयक जागरूकता आणि सामाजिक बांधिलकी वाढण्यास हातभार लागतो.
Vision Abroad