सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी ते दोडामार्ग या सह्याद्रीच्या पट्ट्यात तब्बल आठ पट्टेरी वाघांची नोंद झाली आहे. त्यात पाच मादी, तर तीन नर वाघांचा समावेश आहे. पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात वाघांची अधिकृतरीत्या वनविभागाच्या दप्तरी नोंद झाली आहे.
वनविभाग, सह्याद्री रिझर्व्ह फॉरेस्ट आणि वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन ट्रस्टच्या माध्यमातून जानेवारी ते मे दरम्यान सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आणि कर्नाटकातील काली व्याघ्र प्रकल्प या दोन्ही ठिकाणी हे सर्वेक्षण करण्यात आले होते. यामध्ये सिंधुदुर्गमध्ये आठ वाघांचे अस्तित्व वेगवेगळ्या कॅमेऱ्यामध्ये दिसून आले. हे वाघ सावंतवाडी तालुक्यातील आंबोली दोडामार्ग पट्ट्यात आढळून आले आहेत.
वनशक्ती संस्थेने मांगेली ते आंबोली हा वाघाचा कॉरिडॉर असून तो भाग संरक्षित करावा, यासाठी उच्च न्यायालयात याचिकेला दाखल केली आहे. दीर्घकाळ यावर सुनावणी सुरु आहे. या भागात पट्टेरी वाघ असल्याचे वन शक्तीने वेळोवेळी उच्च न्यायालयात सांगितले आहे. आता भागात विक्रमी नोंद झाल्याने या झाल्याने या मागणीला बळ मिळाले आहे.
Facebook Comments Box
Related posts:
Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावरील दोन गाड्यांच्या संरचनेत तात्पुरत्या स्वरूपाचा बदल
कोकण
प्रवाशांनो कृपया लक्ष द्या...! कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या काही गाड्यांच्या 'या' स्थानकांवरील आगम...
कोकण रेल्वे
सिंधुदुर्ग: जिल्ह्यात मुसळधार पाऊस, रस्त्यावर पाणीच पाणी, शाळांना सुट्टी जाहीर. आंबोली धबधब्यावर प्र...
रत्नागिरी