Konkan Railway Updates:ख्रिसमस सुट्टीसाठी गोव्यात आणि कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी एक खुशखबर आहे. नाताळाच्या सुट्टीत कोकण रेल्वेच्या गाड्यांत होणारी गर्दी कमी करण्याच्या हेतूने मध्य रेल्वेने कोकण रेल्वे मार्गावर ३ विशेष गाड्या चालविण्याच्या निर्णय घेतला आहे. तपशील खालीलप्रमाणे आहे.
१) गाडी क्र. ०११५१ / ०११५२ मुंबई सीएसएमटी – करमाळी – मुंबई सीएसएमटी विशेष (दैनिक):
गाडी क्र. ०११५१ मुंबई सीएसएमटी – करमाळी स्पेशल (दैनिक) ही गाडी दिनांक २०/१२ /२०२४ ते ०५/०१/२०२५ पर्यंत मुंबई सीएसएमटी येथून दररोज रात्री ००.२० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी १३.३० वाजता करमाळीला पोहोचेल.
गाडी क्र. ०११५२ करमाळी – मुंबई सीएसएमटी स्पेशल (दैनिक) ही गाडी करमाळी येथून २०/१२ /२०२४ ते ०५/०१/२०२५ पर्यंत दररोज दुपारी १४.१५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ०३.४५ वाजता मुंबई सीएसएमटीला पोहोचेल.
या गाडीचे थांबे: ही गाडी दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ आणि थिविम स्थानकावर थांबेल.
डब्यांची संरचना: एकूण 22 कोच: फर्स्ट एसी – ०१ कोच. कंपोझिट (फर्स्ट एसी + २ टियर एसी) – ०१ कोच, २ टियर एसी – ०३ कोच, ३ टियर एसी – ११ कोच, स्लीपर – ०२ कोच, जनरल – ०२ कोच, एसएलआर – ०२ कोच
२) गाडी क्र. ०१४६३ / ०१४६४ लोकमान्य टिळक (टी) – कोचुवेली – लोकमान्य टिळक (टी) विशेष (साप्ताहिक):
गाडी क्रमांक ०१४६३ लोकमान्य टिळक (टी) – कोचुवेली स्पेशल (साप्ताहिक) ही गाडी लोकमान्य टिळक (टी) येथून गुरुवारी म्हणजे १९/१२/२०२४, २६/१२/२०२४, ०२/०१/२०२५ आणि ०९/०१/२०२५ रोजी १६:०० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी २२.४५ वाजता कोचुवेलीला पोहोचेल.
गाडी क्रमांक ०१४६४ कोचुवेली – लोकमान्य टिळक (टी) विशेष (साप्ताहिक) ही गाडी कोचुवेली येथून शनिवारी म्हणजे २१/१२/२०२४, २८/१२/२०२४, ०४/०१/२०२५ आणि ११/०१/२०२० रोजी १६.२० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी लोकमान्य टिळक (टी) येथे ००:४५ वाजता पोहोचेल.
या गाडीचे थांबे: ही गाडी ठाणे, पनवेल, पेण, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम, करमाळी, मडगाव जंक्शन, कारवार, गोकर्ण रोड, कुमठा, मुर्डेश्वर, भटकळ, मुक्काम रोड बायंडूर (एच), कुंदापुरा, उडुपी, सुरथकल, मंगळुरु जं., कासरगोड, कन्नूर, कालिकत, तिरूर, शोरानूर जं. , त्रिशूर, एर्नाकुलम टाउन, कोट्टायम, तिरुवल्ला, चेंगन्नूर, मावेलीकारा, कायनकुलम आणि कोल्लम जंक्शन. या स्थानकांवर थांबेल
डब्यांची सरंचना: एकूण २२ एलएचबी कोच = २ टायर एसी – ०२ कोच, ३ टायर एसी – ०६ कोच, स्लीपर – ०९ कोच, जनरल – ०३ कोच, जनरेटर कार – ०१ , एसएलआर – ०१ कोच
3) ट्रेन क्र. ०१४०७ / ०१४०८ पुणे जं. – करमाळी – पुणे जं. विशेष (साप्ताहिक):
गाडी क्रमांक ०१४०७ पुणे जं. – करमाळी विशेष (साप्ताहिक) ही गाडी पुणे जंक्शन येथून बुधवारी दिनांक २५/१२/२०२४, ०१/०१/२०२५ आणि ०८/०१/२०२५ रोजी ०५:१० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी २०:२५ वाजता करमाळीला पोहोचेल.
गाडी क्रमांक ०१४०८ करमाळी – पुणे जं. विशेष (साप्ताहिक) करमाळी येथून बुधवारी दिनांक २५/१२/२०२४, ०१/०१/२०२५ आणि ०८/०१/२०२५ रोजी २२.०० वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी १३.०० वाजता पोहोचेल
ही गाडी चिंचवड, तळेगाव, लोणावळा, कल्याण, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिविम स्थानकावर थांबेल.
डब्यांची सरंचना: एकूण १७ कोच = फर्स्ट एसी – ०१ कोच, २ टायर एसी – ०१ कोच, ३ टायर एसी – ०२ कोच, स्लीपर – ०५ कोच, जनरल – ०६ कोच आणि एसएलआर – ०२ कोच
गाडी क्रमांक ०११५२ आणि ०१४०८ या गाड्यांचे आरक्षण दिनांक १४/१२/२०२४ रोजी सर्व प्रवासी आरक्षण प्रणाली (PRS), इंटरनेट आणि IRCTC वेबसाइटवर उपलब्ध होणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
Facebook Comments Box
Vision Abroad