मुंबई: आजची मुंबई मडगाव वंदे भारत एक्सप्रेस तांत्रिक बिघाडामुळे ठाणे ते पनवेल दरम्यान तिच्या नियमित मार्गावरून वळविण्यात आली. या कारणाने पुढे तिचा गोव्याला जाणारा प्रवास ९० मिनिटे उशिराने झाला.
कोकणात जाणारी ही गाडी दिवा-पनवेल रेल्वे मार्गावर पनवेल स्थानकाकडे जाण्याऐवजी सकाळी ६:१० वाजता कल्याण मार्गावरून निघाली.
या घटनेमुळे मध्य रेल्वेवरील मुंबई लोकल सेवेवरही परिमाण झाला आणि या दरम्यानच्या लोकल गाड्यांनी लेटमार्क लावला.
मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील निला यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, दिवा जंक्शनवरील कोकणात जाणार्या गाड्यांचा मार्गावर म्हणजे डाऊन फास्ट लाईन आणि पाचव्या लाईन दरम्यान पॉइंट क्रमांक १०३ वर सिग्नलिंग आणि टेलिकम्युनिकेशन सिस्टममध्ये बिघाड झाल्यामुळे ही घटना घडली.
ट्रेनने नियोजित मार्गावरून मार्ग बदलल्यानंतर, ती कल्याण स्टेशनला रवाना झाली आणि दिवा जंक्शनवर परत फिरविण्यात आली आणि दिवा-पनवेल मार्गावर मडगावकडे परत प्रवास सुरू केला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
नीला म्हणाले की, सकाळी ६:१० ते ६:४५ पर्यंत कल्याणकडे जाण्यापूर्वी ही गाडी दिवा जंक्शनवर सुमारे ३५ मिनिटे थांबली होती.
जून २०२३ मध्ये सुरू झालेली प्रीमियम सीएसएमटी-मडगाव वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन मुंबईतील सीएसएमटी (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) येथून सकाळी ५:२५ वाजता निघते आणि त्याच दिवशी दुपारी १:१० वाजता गोव्यातील मडगावला पोहोचते.
Vision Abroad