२५ डिसेंबर पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-दशमी – 22:31:51 पर्यंत
  • नक्षत्र-चित्रा – 15:22:47 पर्यंत
  • करण-वणिज – 09:15:28 पर्यंत, विष्टि – 22:31:51 पर्यंत
  • पक्ष- कृष्ण
  • योग-अतिगंड – 21:45:38 पर्यंत
  • वार- बुधवार
  • सूर्योदय- 07:11
  • सूर्यास्त- 18:07
  • चन्द्र-राशि-तुळ
  • चंद्रोदय- 26:55:00
  • चंद्रास्त- 13:48:59
  • ऋतु- शिशिर
जागतिक दिवस:
  • ख्रिसमस डे : येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस
  • राष्ट्रीय सुशासन दिवस.
महत्त्वाच्या घटना:
  • ०: रोममध्ये पहिल्यांदा नाताळ साजरे करण्यात आले.
  • १७७१: मुघल प्रशासक दुसरा शाह आलम दिल्लीच्या सिंहासनावर बसले.
  • १७६३: भरतपूर चे महाराजा सुरजमल यांची हत्या.
  • १९४६: ताईवान ने संविधानाला स्वीकारले.
  • १९७४: रोम जात असेलेले एअर इंडिया चे बोईंग ७४७ चे अपहरण.
  • १९७६: ’आय. एन. एस. विजयदुर्ग’ ही युद्धनौका भारतीय नौदलात सामील
  • १९९०: वर्ल्ड वाइड वेबची (www) पहिली यशस्वी चाचणी
  • १९९१: मिखाईल गोर्बाचेव्ह यांनी सोविएत संघराज्याच्या (USSR) अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. याच्या दुसऱ्याच दिवशी सोविएत संघराज्याचे विघटन करण्यात आले आणि जनमत चाचपणीच्या आधारे सर्वप्रथम युक्रेन हा देश सोव्हिएत संघराज्यातुन बाहेर पडला.
  • २००२: चीन आणि बांगलादेश मध्ये संरक्षण करार पार पडला.
  • २००५: ४०० वर्षाआधी लुप्त झालेला पक्षी “डोडो” चे दोन ते तीन हजार वर्ष जुने अवशेष आढळले.
  • २००८: भारताने पाठविलेल्या चंद्रयान-१ च्या पेलोडर ने चंद्राचा पहिला नवीन फोटो पाठविला.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १६४२: सर आयझॅक न्यूटन – इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ, गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ. गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला. गणितातील ‘कॅल्क्युलस’ या शाखेचे जनक (मृत्यू: २० मार्च १७२७)
  • १८२१: अमेरिकन रेड क्रॉसच्या संस्थापिका क्लारा बार्टन यांचा जन्म. (मृत्यू: १२ एप्रिल १९१२)
  • १८६१: पण्डित मदन मोहन मालवीय – बनारस हिन्दू विश्वविद्यालयाचे एक संस्थापक (मृत्यू: १२ नोव्हेंबर १९४६)
  • १८७२: संस्कृत भाषेचे विद्वान पंडित गंगानाथ झा यांचा जन्म.
  • १८७६: बॅ. मुहम्मद अली जिना – पाकिस्तानचे प्रणेते व पहिले गव्हर्नर जनरल (मृत्यू: ११ सप्टेंबर १९४८)
  • १८७८: शेवरले कंपनीचे सहसंस्थापक लुई शेवरोलेट यांचा जन्म. (मृत्यू: ६ जून १९४१)
  • १८८६: पाकिस्तानचे प्रणेते व पहिले गव्हर्नर जनरल बॅ. मुहम्मद अली जिना यांचा जन्म. (मृत्यू: ११ सप्टेंबर १९४८)
  • १८८९: रीडर डायजेस्टच्या सहसंस्थापिका लीला बेल वॉलेस यांचा जन्म. (मृत्यू: ८ मे १९८४)
  • १९११: बर्न होगार्थ – जंगलचा सम्राट टारझन याला कार्टुनद्वारे अजरामर करणारे अमेरिकन व्यंगचित्रकार, लेखक, शिक्षणतज्ञ (मृत्यू: २८ जानेवारी १९९६ – पॅरिस, फ्रान्स)
  • १९१६: अल्जेरियाचे पहिले अध्यक्ष अहमद बेन बेला यांचा जन्म. (मृत्यू: ११ एप्रिल २०१२)
  • १९१८: अन्वर सादात – इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष व नोबेल पारितोषिक विजेते (मृत्यू: ६ आक्टोबर १९८१)
  • १९१९: नौशाद अली – संगीतकार (मृत्यू: ५ मे २००६)
  • १९२१: भारतीय-पाकिस्तानी पत्रकार आणि लेखक झैब-अन-नसीसा हमिदुल्ला यांचा जन्म. (मृत्यू: १० सप्टेंबर २०००)
  • १९२४: अटलबिहारी बाजपेयी – भारताचे १० वे पंतप्रधान, भारतीय जनता पक्षाचे नेते, असामान्य संसदपटू, अलौकिक वक्ते व उत्तुंग प्रतिभेचे ओजस्वी कवी, पद्मविभूषण
  • १९२५: प्रसिद्ध चित्रकार सतीश गुजराल यांचा जन्म.
  • १९२६: चित्त बसू – संसदपटू, ’फॉरवर्ड ब्लॉक’चे सरचिटणीस (मृत्यू: ५ आक्टोबर १९९७)
  • १९२६: डॉ. धर्मवीर भारती – हिन्दी लेखक, कवी, नाटककार, पत्रकार व ’धर्मयुग’ साप्ताहिकाचे २७ वर्षे संपादक, ’अभ्युदय’ व ’संगम’ या नियतकालिकांचे संपादनही त्यांनी केले. (मृत्यू: ४ सप्टेंबर १९९७)
  • १९२७: पं. रामनारायण – सुप्रसिद्ध सारंगीये
  • १९३२: प्रभाकर जोग – व्हायोलिनवादक, संगीत संयोजक व संगीतकार
  • १९३६: भारतीय-इंग्रजी दिग्दर्शक व निर्माते इस्माईल मर्चंट यांचा जन्म. (मृत्यू: २५ मे २००५)
  • १९४९: नवाझ शरीफ – पाकिस्तानचे १२ वे पंतप्रधान
  • १९५९: भारतीय कवी आणि राजकारणी रामदास आठवले यांचा जन्म.
  • १९८०: राष्ट्रवादी मुस्लीम नेते मुख्तार अहमद अंसारी यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १९४९: वॉर्नर ब्रदर्स कार्टूनचे संस्थापक लिओन स्चलिंगर यांचे निधन. (जन्म: २० मे १८८४)
  • १९५७: प्रा. श्रीपाद महादेव तथा श्री. म. माटे – साहित्यिक, विचारवंत व अस्पृश्यता निवारणासाठी सतत प्रयत्‍न करणारे कृतिशील समाजसुधारक. १९१६ मध्ये त्यांनी दलितांसाठी रात्रशाळा काढली व वीस – पंचवीस वर्षे मोफत शिकवले. (जन्म: २ सप्टेंबर १८८६)
  • १९७२: चक्रवर्ती राजगोपालाचारी – भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल, मद्रास इलाख्याचे मुख्यमंत्री, स्वातंत्र्यसेनानी, कायदेपंडित, मुत्सद्दी आणि लेखक (जन्म: १० डिसेंबर १८७८)
  • १९७७: चार्ली चॅपलिन – अभिनेता, दिग्दर्शक आणि संगीतकार. त्यांच्या ‘लाईम लाईट‘ या चित्रपटाला ऑस्कर पारितोषिक मिळाले होते. ’कीड ऑटो रेसेस अ‍ॅट व्हेनिस’ या त्यांच्या दुसर्‍या चित्रपटातील डर्बी हॅट, घट्ट कोट ढगळ पँट, चौकोनी मिशा, बेढब जोडे आणि काठी या वेशभूषेमुळे चार्ली चॅप्लिन म्हणजे लोकांना मूर्तिमंत विनोद वाटू लागले. (जन्म: १६ एप्रिल १८८९)
  • १९८९: रोमेनियाचे पहिले अध्यक्ष निकोला सीउसेस्कु यांचे निधन. (जन्म: २६ जानेवारी १९१८)
  • १९९४: ग्यानी झैलसिंग – भारताचे ७ वे राष्ट्रपती, पंजाबचे मुख्यमंत्री, केंद्रीय गृहमंत्री (जन्म: ५ मे १९१६)
  • १९९५: डीन मार्टिन – अमेरिकन गायक, संगीतकार व निर्माते (जन्म: ७ जून १९१७)
  • १९९८: दत्तात्रय गोविंद तथा दत्ता खेबुडकर – नाटककार व दिग्दर्शक (? ? १९२५)
  • २०१५: भारतीय अभिनेत्री साधना शिवदासानी यांचे निधन.

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.
Facebook Comments Box
Call on 9028602916 For More Details 






मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search