आजचे पंचांग
- तिथि-त्रयोदशी – 27:34:55 पर्यंत
- नक्षत्र-अनुराधा – 22:13:45 पर्यंत
- करण-गर – 15:06:41 पर्यंत, वणिज – 27:34:55 पर्यंत
- पक्ष- कृष्ण
- योग-शूल – 22:22:26 पर्यंत
- वार- शनिवार
- सूर्योदय- 07:12
- सूर्यास्त- 18:08
- चन्द्र-राशि-वृश्चिक
- चंद्रोदय- 29:38:59
- चंद्रास्त- 15:48:00
- ऋतु- शिशिर
महत्त्वाच्या घटना:
- १६१२: गॅलिलिओ गॅलिली याने प्रथमच नेपच्यून या ग्रहाचा शोध लावला. मात्र तेव्हा त्याला तो तारा आहे असे वाटले होते.
- १८३६: स्पेनने मेक्सिकोच्या स्वातंत्र्याला मान्यता दिली.
- १८४६: आयोवा हे अमेरिकेचे (USA) २९ वे राज्य बनले.
- १८९५: ऑगस्टा व लुई या ल्युमियर बंधूंनी पॅरिस येथे चित्रपटाचा जगातील पहिला खेळ सादर केला. या खेळाचे तिकीट होते एक फ्रँक. पहिल्या खेळाचे उत्पन्न आले फक्त ३५ फ्रँक. मात्र नंतर तो खेळ एवढा लोकप्रिय झाला की आठवडाभरातच त्याचे दिवसाला २० खेळ होऊन दिवसाला २००० फ्रँक एवढे भरघोस उत्पन्न मिळू लागले. ल्युमिअर बंधू
- १८८५: मुंबई येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची (Indian National Congress) स्थापना
- १९०८: मेसिना, सिसिली येथे भूकंप. ७५००० लोकांचे निधन.
- १९२६: इंपिरियल एयरवेज ने भारत आणि इग्लंड यांच्या मध्ये पहिली पोस्ट सेवा सुरु केली.
- १९४८: मुंबई राज्यात कसेल त्यांची जमीन हा कुळ कायदा लागू झाला.
- १९८३: भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी वेस्ट इंडीस विरुद्ध ३० वे शतक पूर्ण करून सर डॉन ब्रॅडमन यांचे रेकॉर्ड तोडले.
- १९८४: राजीव गांधींच्या नेतृत्वामध्ये कॉंग्रेसने लोकसभेची निवडणूक जिंकली.
- १९९५: कझाकस्तान मधील बैकानूर अंतराळ तळावरून भारताच्या आयआरएस १-सी या दूरसंवेदन उपग्रहाचे प्रक्षेपण केले.
- २०००: भारतीय डाक विभागाने वीरता पुरस्काराच्या सन्मानार्थ पाच पोस्टाचे तिकीटांचा एक सेट ३ रुपयांचे एक सचित्र तिकीट जारी केले.
- २०१३: आम आदमी पार्टी ने कॉग्रेस सोबत गठबंधन करून दिल्ली मध्ये सरकार बनविले.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
- १८५६: वूड्रो विल्सन – अमेरिकेचे २८ वे राष्ट्राध्यक्ष आणि नोबेल पारितोषिक विजेते (मृत्यू: ३ फेब्रुवारी १९२४)
- १८९९: गजानन त्र्यंबक तथा ग. त्र्यं. माडखोलकर – कादंबरीकार, समीक्षक आणि पत्रकार (मृत्यू: २७ नोव्हेंबर १९७६)
- १९००: मराठी पत्रकार लेखक तसेच कादंबरीकार गजानन त्र्यंबक माडखोलकर यांचा जन्म.
- १९०३: हंगेरीत जन्मलेला गणितज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ, गणकशास्रज्ञ आणि अर्थशास्त्रज्ञ जॉन फोन न्यूमन यांचा जन्म.
- १९११: फणी मुजुमदार – चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व पटकथा लेखक. दूरदर्शनवर लोकप्रिय झालेल्या ’रामायण’ या मालिकेची पटकथा त्यांनी लिहिली होती. चित्रपटसृष्टीतील सहा दशकांच्या वाटचालीत त्यांनी केवळ हिन्दीतच नव्हे तर चिनी, बंगाली, मल्याळी, उडिया व इंग्रजी चित्रपटांच्या निर्मितीत मोठे नाव कमावले. (मृत्यू: १६ मे १९९४)
- १९२२: अमेरिकन कॉमिक्स लेखक स्टॅन ली यांचा जन्म.
- १९२६: हुतात्मा शिरीषकुमार (मृत्यू: १० ऑगस्ट १९४२)
- १९३२: धीरुभाई अंबानी – उद्योगपती (मृत्यू: ६ जुलै २००२)
- १९३७: जगप्रसिद्ध भारतीय उद्योजक रतन टाटा यांचा जन्म.
- १९४०: ए. के. अँटनी – भारताचे परराष्ट्रमंत्री
- १९४१: भारतीय-पाकिस्तानी क्रिकेटर आणि प्रशिक्षक इंतिखाब आलम यांचा जन्म.
- १९४५: वीरेंद्र – नेपाळचे राजे (मृत्यू: १ जून २००१)
- १९५२: अरुण जेटली – केंद्रीय मंत्री व वकील
- १९६९: लिनक्स गणक यंत्रप्रणालीचा जनक लिनस तोरवाल्ड्स यांचा जन्म.
- २००१: अंडर-१९ च्या भातीय टीम चे सदस्य यशस्वी जैसवाल चा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
- १६६३: फ्रॅन्सेस्को मारिया ग्रिमाल्डी – इटालियन गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: २ एप्रिल १६१८)
- १९३१: आबालाल रहमान – चित्रकार (जन्म: ? ? १८६०)
- १९७१: पंजाबी साहित्यिक नानकसिंग यांचे निधन.
- १९७४: राजस्थान चे पहिले मुख्यमंत्री हीरा लाल शास्त्री यांचे निधन.
- १९७७: सुमित्रानंदन पंत – छायावादी विचारधारेतील हिन्दी कवी (जन्म: २० मे १९००)
- १९८१: हिन्दी चित्रपटांत चार दशके चरित्र अभिनेत्याच्या भूमिका करणारे डेविड अब्राहम चेऊलकर तथा डेविड यांचे कॅनडातील टोरांटो येथे निधन झाले. (जन्म: ? ? १९०९)
- २०००: मेघश्याम पुंडलिक तथा मे. पुं. रेगे – तत्त्वचिंतक, मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष (जन्म: २४ जानेवारी १९२४ – वेंगुर्ला)
- २०००: ध्रुपदगायक उस्ताद नसीर अमीनुद्दीन डागर यांचे निधन. (जन्म: २४ जानेवारी १९२४ – वेंगुर्ला)
- २००२: पद्मश्री पुरस्काराने सन्मानित अच्युत कानविंडे यांचे निधन
- २००३: कृष्णाजी सुंदरराव तथा कुशाभाऊ ठाकरे यांचे निधन.
- २००६: प्रभाकर पंडित – संगीतकार व व्हायोलिनवादक (जन्म: ३० सप्टेंबर १९३३)
दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.
Facebook Comments Box
Vision Abroad