Konkan Railway : आडवली येथे वायर तुटल्याने कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळित झाली आहे. या मार्गावरील दोन्ही दिशेची वहतूक बंद झाली आहे. ही घटना दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली असून अनेक गाड्या दीड ते दोन तासांपेक्षा अधिक काळ विविध रेल्वे स्थानकावर अडकून पडलेल्या आहेत.
मुंबई मडगाव मांडवी एक्स्प्रेस संगमेश्वर येथे दीड तासापासुन उभी आहे तर मडगाव मुंबई मांडवी एक्स्प्रेस रेल्वे गाडी वैभववाडी येथे दीड तासांपासून थांबलेली आहे. मुंबई मडगाव तेजस एक्स्प्रेस रेल्वे गाडी दोन तासांपासून रत्नागिरी येथे उभी आहे. तर जनशताब्दी अडीच तासांपासून आडवली येथे थांबवून ठेवण्यात आली आहे.
ओव्हरहेड वायर जोडण्याचे काम यद्धपातळीवर सुरु असून पुढील दीड ते दोन तासात वाहतूक पुर्वत होईल असे कोकण रेल्वे चे जनसंपर्क अधिकारी सचिन देसाई यांनी सांगितले आहे.
Facebook Comments Box
Vision Abroad