ठाणे: मराठीची मागणी केली म्हणून तेथील जमावाने मराठी मुलाला माफी मागायला लावली आणि हा माफीचा विडिओ सोशल माध्यमांवर व्हायरल केला होता. या प्रकरणाची मुंब्रा पोलिसांनी दखल घेतली असून या प्रकरणी दोषींवर विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांची मुंब्रा पोलीस ठाण्याला भेट
मुंब्रा येथे घडलेल्या प्रकरणी मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली असून त्यांनी काल शुक्रवारी मुंब्रा पोलीस ठाण्याला भेट देवून त्या जमावातील दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली.
मुंब्रा पोलिसांनी जाहीर केलेली प्रेसनोट
मुंब्रा पोलीस स्टेशनच्या हद्दीत दि.०२/०१/२०२५ रोजी रोजी १५:३० वा.सु कौसा आयडियल मार्केट, अंबाजी मेडिकल समोर कौसा, मुंब्रा, ता. जि. ठाणे येथे एक मराठी युवक फळ विक्रेताकडुन फळे विकत घेताना फळविक्रेता यास मराठीत बोलण्याची विनंती केली असता फळविकत्याने मराठी युवकासोबत हुज्जत घातली होती. सदरवेळी फळ विक्रेता याने एस.डी.पी.आय. पक्षाचे पदाधिकाऱ्यांना बोलावुन गर्दी जमा केली तसेब सदर जमलेल्या गर्दीतील लोकांनी मराठी युवकास घेराव करून त्यास कान पकडुन माफी मागण्यास सांगीतली व सदरवेळी त्याचा हिडीओ बनवुन तो सोशल मिडीयावर प्रसारीत केला होता.
सदरचा हिडीओ सोशल मिडीयावर प्रसारीत झाल्याने तसेच विविध न्युज चॅनेलवर प्रसारीत झाल्याने मराठी व हिंदी भाषीक यांच्यात तेढ निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली होती. सदरचा व्हिडीओ मुंब्रा पोलीस स्टेशनला प्राप्त होताच त्यांनी नमुद प्रकरणाची तात्काळ गंभीर दखल घेवुन सदर फळ विक्रेता शोएब मोहम्मद नसीम कुरेशी, व्हिडीओमधील एस.डी.पी.आय. पक्षाचे पदाधिकारी अब्दुल रहेमान दिलशाद अन्सारी, उजेर जाफर आलम शेख तसेब २० ते २५ अनोळखी इसम यांचे विरुध्द मुंब्रा पोलीस स्टेशन येथे सरकारतर्फे गु.र.नं.१२/२०२५ म.पो.का. कलम ३७ (३)१३५ प्रमाणे तसेच फिर्यादी मारूती गवळी यांचा जबाब नोंद करून भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १९६, १३५, ३५३(२), ३५१ (२) (३), ३५२, १२७ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच सदर गुन्हयातील आरोपीत यांची ओळख पटवुन त्यांचा शोध घेवुन त्यांचे विरुध्द सदर गुन्हयावे अनुषंगाने पुढील कार्यवाही करण्यावी तजविज ठेवण्यात आली आहे.
नमुद गुन्हयाच्या तपास मा. पोलीस आयुक्त श्री आशुतोष डुंबरे, सह पोलीस आयुक्त श्री ज्ञानेश्वर वव्हाण, अपर पोलीस आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग) श्री विनायक देशमुख, पोलीस उप आयुक्त श्री सुभाष बुरसे, सहा. पोलीस आयुक्त श्री उत्तम कोळेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अनिल शिंदे, यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी सपोनि / लोंढे हे करीत आहेत.
Vision Abroad