ST Bus Accident: एसटीच्या ताफ्यातील बऱ्याच गाड्या जुन्या झाल्या आहेत. या गाड्यांची योग्य रित्या देखरेख केली जात नसल्याची तक्रार आजकाल ऐकायला मिळत आहे. यामुळे अपघात होण्याच्या शक्यता वाढल्या असून एसटी महामंडळ प्रवाशांच्या जीवाशी खेळत आहे. बसेसच्या देखरेखीत कुसूर केल्याने आज एका घटनेत एका बसचा मोठा अपघात होता होता वाचला.
वज्रेश्वरी – वसई या चालत्या एसटी बसचे पुढचे चाक अचानक निखळले आणि बाजूला जाऊन पडले. सुदैवाने चालकाने गाडीवर नियंत्रण ठेवल्याने कोणताही मोठा अपघात झाला नाही. मात्र या घटनेने एसटी प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा पुढे आला आहे. ती बस जर अजून वेगात असती तर ती पलटी होऊन मोठी दुर्घटना घडली असती. दुसरे म्हणजे चाक निखळले तेव्हा रस्त्यावर कोणी नव्हते, नाहीतर एखादी दुर्दैवी घटना घडली असती.
या घटनेचा विडिओ खाली पहा
Video | धक्कादायक! धावत्या एसटी बसचे पुढील चाक निखळले; मोठा अनर्थ होता होता टळला – Kokanai
सविस्तर वृत्त#Staccident https://t.co/yEnyi55xXw pic.twitter.com/tRAUbv2z8l— Kokanai Digital News Channel (@kokanai21) February 2, 2025
Facebook Comments Box
Vision Abroad