



डोंबिवली: समाज माध्यमांचा प्रभावी वापर करून आपला आवाज योग्य ठिकाणी पोहोचवून प्रशासनाकडून झालेल्या चुका सुधारता येतात हे डोंबिवली मध्ये एका नागरिकाने सिद्ध केले आहे.
मुंबई उपनगरीय रेल्वेच्या डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म नंबर 5 वर पादचारी पूल आणि सरकत्या जिन्यासाठी काम चालू असल्याच्या सुचनेचा बॅनर मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत लावण्यात आला होता. मात्र या बॅनर वर लिहिण्यात आलेली मराठी भाषा चुकीच्या पद्धतीने लिहिण्यात आली होती. त्यात बर्याच चुका होत्या.
ही गोष्ट अनुजा धाकरस नावाच्या महिलेने ‘एक्स’ माध्यमावर दिनांक १० फेब्रुवारी रोजीला पोस्ट करून मध्य रेल्वे आणि संबधित आस्थापनांना टॅग केले.
”हे कोणतं मराठी आहे??? रेल्वेमध्ये मराठी भाषिकांचा एवढा तुटवडा असावा का की २ ओळींची सूचना सुद्धा धड मराठीत लिहू शकत नाहीत?” अशा शब्दात ही पोस्ट करण्यात आली होती.
रेल्वे प्रशासनाने या प्रकारची दखल घेतली आणि दोन दिवसांतच या जागी चुका दुरुस्त केलेला बॅनर लावला.
धन्यवाद 🙏 @rajtoday @Central_Railway @drmmumbaicr https://t.co/890XYajiqh pic.twitter.com/WiTTMf1HLQ
— Anuja Dhakras (@AnujaDhakras21) February 10, 2025