



Ladki Bahin Yojana : राज्यातील लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेतील फेब्रुवारीचा हप्ता उद्यापासून द्यायला सुरुवात होणार आहे. यासाठी वित्त विभागाकडून (Finance Department) 3490 कोटी रुपये वर्ग करण्यात आले आहेत.
अनेक महिला अपात्र ठरण्याची शक्यता
डिसेंबर अखेर 2 कोटी 46 लाख महिला लाभार्थी होत्या. त्यातील ५ लाख महिला अपात्र झाल्यानंतर जानेवारीअखेर 2 कोटी 41 लाख लाभार्थी महिला होत्या. मात्र, अद्याप फेब्रुवारी अखेरची आकडेवारी आलेली नाही. मात्र, ती साधारणपणे 4 लाख असेल अशी माहिती आहे. त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून कमी केलेल्या महिलांची संख्या 9 लाख होणार आहे. या कपातीमुळे राज्य सरकारच्या 945 कोटी रुपयांची बचत होणार असल्याची माहिती आहे.
नमो शेतकरी योजनेचा लाभ आणि लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणा-या 5 लाख महिला आहेत. या महिलांना लाडकी बहिण योजनेतील फक्त 500 रुपये मिळणार तर नमो शेतकरी योजनेतून 1000 रुपये मिळणार आहेत. दिव्यांग विभागातून लाभ मिळणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेतून त्यांना वगळलं जाणार आहे. वाहनं असलेल्या अडीच लाख महिला आहेत त्यांना ही यातून वगळण्यात आलं आहे. सोबतच निकषात न बसणा-या अनेक महिला आहेत त्यांनी ही पैसे परत करायला सुरुवात केली आहे.