आंबोली: आंबोली येथील कबुलायतदार प्रश्न सुटत नाही तोपर्यंत येथून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्याचा निर्धार येथील ग्रामस्थांनी केला आहे. शक्तीपीठ महामार्ग ला विरोध करण्यासंदर्भात बैठक आज असून जमिनींचा 7/12 तयार झाल्याशिवाय आणि ग्रामस्थांना जमीन वाटप होईपर्यंत या महामार्गाला विरोध असल्याचे ग्रामस्थांचे एकमत आहे.
फणसवडे येथून घाटात बोगदा मारून पारपोली हद्दीतून आंबोली तांबुळगे खुळ्याची ढोल,मलई,नारायण गड,सतीची वाडी वरचा डोंगर,कावळेसाद तेथून कितवडे मार्गे कोल्हापूर असा रस्ता जात आहे.हा शक्तीपीठ महामार्ग नागपूर ते गोवा असा सहा पदरी रस्ता जात आहे. आंबोली गेळे येथील कबुलायतदार प्रश्न गेली २५ वर्षे महाराष्ट्र शासन भूमिपुत्रांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले आहे.इथे भूमिपुत्र उपरे ठरत असून अतिक्रमन शासनाच्या आशीर्वादानेच होत आहे.वन खात्याचा प्रश्न सांगून हिरण्यकेशी चा रस्ता देखील होत नाही.तर दुसरीकडे बिल्डर लॉबी ला सगळं रान मोकळ आहे. त्यामुळे इथले स्थानिक हे वर्षानुवर्षे भूमी पासून वंचित राहिले.त्यात एक पिढी जमिनीची प्रतीक्षा करता करता संपली.पुढे भविष्यात देखील कठीन परिस्थिती आहे.
वन खात्याच्या जमिनी शक्तीपीठ हायवे साठी घेण्यात येतील मात्र आंबोलीतील वन खात्याच्या स्थानिकांच्या जमिनी बाबत निर्णय कधी? शासन आणि लोकप्रतिनिधी ग्रामस्थांना फक्त आश्वासनावर ठेवता २५ वर्षे संपली. त्यामुळे आता शासनाने आंबोली जमिनीबाबत निर्णय घ्यावा.अन्यथा शक्तीपीठ महामार्ग ला ग्रामस्थांचा विरोध करण्याचा एकमुखी ठराव आंबोली ग्रामस्थांनी केला आहे.शक्तीपीठ महामार्ग संघर्ष समितीने याची दखल घ्यावी आणि येथील प्रश्नाबाबत शासनाचे डोळे उघडावे असे आवाहन ही करण्यात आले आहे.२५ वर्षे इथला जमीन प्रश्न शासन सोडवत नसल्यामुळे भूमिपुत्र वंचित राहिले आहेत.त्या मुळे आता ठोस निर्णयाची आवश्यकता असल्याचे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
Facebook Comments Box