



Mumbai Amrit Bharat Express : मुंबईमधील रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे, देशाच्या आर्थिक राजधानीला अमृत भारत एक्सप्रेसची भेट मिळणार आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांचा प्रवास आणखी सुपरफास्ट होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार ही अमृत भारत एक्सप्रेस ट्रेन येत्या काही महिन्यांनी मुंबईवरून सुरू होणार आहे. मुंबई ते बिहार दरम्यान ही गाडी चालवली जाणार असून यामुळे बिहार मधून मुंबईला आणि मुंबईमधून बिहारला जाणाऱ्या प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, पुढील आठवड्यापासून बिहार ते मुंबई दरम्यान अमृत भारत एक्सप्रेस ट्रेन चालवली जाईल अशी शक्यता आहे. पंतप्रधान मोदी जेव्हा बिहारला भेट देतील तेव्हा ते या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्याची शक्यता आहे.
दरम्यान ही नवीन अमृत भारत ट्रेन सहरसा आणि मुंबई दरम्यान धावणार आहे. यामुळे मुंबई ते सहरसा हा प्रवास वेगवान होणार आहे. खरे तर बिहारला या आधी सुद्धा अमृतभारत एक्सप्रेस ची भेट मिळालेली आहे.
बिहार मधील पहिली अमृत भारत एक्सप्रेस ट्रेन दरभंगा ते आनंद विहार टर्मिनल (ANVT) या मार्गावर धावत आहे. आता या मार्गानंतर, मुंबई ते सहरसा या मार्गावर अमृत भारत ट्रेन सुरू होण्याची शक्यता असून ही बिहारची दुसरी अमृत भारत एक्सप्रेस ट्रेन असेल.