आजचे पंचांग
- तिथि-दशमी – 16:46:54 पर्यंत
- नक्षत्र-धनिष्ठा – 12:08:56 पर्यंत
- करण-विष्टि – 16:46:54 पर्यंत, भाव – 27:46:12 पर्यंत
- पक्ष- कृष्ण
- योग-शुक्ल – 18:50:40 पर्यंत
- वार- बुधवार
- सूर्योदय- 06:18
- सूर्यास्त- 18:56
- चन्द्र-राशि-कुंभ
- चंद्रोदय- 27:30:00
- चंद्रास्त- 14:31:59
- ऋतु- ग्रीष्म
जागतिक दिवस :
- राष्ट्रीय सहलीचा दिवस International Picnic Day
- इंग्रजी भाषा दिन English Language Day
- जागतिक पुस्तक आणि कॉपीराइट दिन World Book & Copyright Day
महत्त्वाच्या घटना :
- 1635 : बोस्टन लॅटिन स्कूल, अमेरिकेतील पहिली सार्वजनिक शाळा, स्थापन झाली.
- 1818 : ब्रिटीश अधिकारी मेजर हॉल यांना कर्नल प्रायर यांनी रायगड किल्ल्यावर गस्त घालण्यासाठी पाठवले.
- 1984 : वैज्ञानिकांना एड्सचा विषाणू सापडला.
- 1990 : नामिबियाचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश.
- 1995 : जागतिक पुस्तक दिन प्रथमच साजरा करण्यात आला.
- 2005 : मी अॅट द झू हा पहिला व्हिडिओ युट्यूब वर प्रकाशित झाला.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
- 1564 : ‘विल्यम शेक्सपियर’ – इंग्लिश नाटककार, लेखक आणि अभिनेते यांचा जन्म. (निधन: 23 एप्रिल 1616)
- 1791 : ‘जेम्स बुकॅनन’ – अमेरिकेचे १५ वे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू: 1 जून 1868)
- 1858 : ‘मॅक्स प्लँक’ – नोबेल पारितोषिक विजेते जर्मन भौतिक शास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 4 ऑक्टोबर 1947)
- 1858 : ‘पंडिता रमाबाई सरस्वती’ – समाजसुधारक यांचा जन्म. (मृत्यू: 5 एप्रिल 1922)
- 1873 : ‘महर्षी विठ्ठल रामजी शिंदे’ – अस्पृश्यता निवारण हे जीवनध्येय मानलेले व्यासंगी समाजसुधारक यांचा जन्म. (मृत्यू: 2 जानेवारी 1944)
- 1897 : ‘लेस्टर बी. पिअर्सन’ – नोबेल पारितोषिक विजेते कॅनडाचे 14 वे पंतप्रधान यांचा जन्म. (मृत्यू: 27 डिसेंबर 1972)
- 1938 : ‘एस. जानकी’ – शास्त्रीय गायिका यांचा जन्म.
- 1968 : ‘किशोरी शहाणे’ – अभिनेत्री यांचा जन्म.
- 1969 : ‘मनोज बाजपेयी’ – अभिनेते मनोज बाजपेयी यांचा जन्म.
- 1977 : ‘काल पेन’ – भारतीय-अमेरिकन अभिनेते यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
- 1616 : ‘विल्यम शेक्सपियर’ – इंग्लिश नाटककार, लेखक आणि अभिनेते यांचे निधन. (जन्म: 23 एप्रिल 1564)
- 1850 : ‘विल्यम वर्डस्वर्थ’ – काव्यातील स्वच्छंदतावादाचे प्रणेते इंग्लिश कवी यांचे निधन. (जन्म: 7 एप्रिल 1770)
- 1926 : ‘हेन्री बी. गुप्पी’ – ब्रिटिश वनस्पतिशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म: 23 डिसेंबर 2854)
- 1958 : ‘शंकर श्रीकृष्ण देव’ – निष्ठावान समर्थभक्त, समर्थ वाङ्मयाचे आणि संप्रदायाचे अभ्यासक व प्रकाशक यांचे निधन. (जन्म: 10 ऑक्टोबर 1871)
- 1968 : पतियाळा घराण्याचे गायक व वीणावादक बडे गुलाम अली खाँ ऊर्फ सबरंग यांचे निधन. (जन्म: 2 एप्रिल 1902)
- 1986 : ‘जिम लेकर’ – इंग्लिश क्रिकेट खेळाडू यांचे निधन. (जन्म: 9 फेब्रुवारी 1922)
- 1992 : ‘सत्यजित रे’ – ख्यातनाम चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक यांचे निधन. (जन्म: 2 मे 1921)
- 1997 : ‘डेनिस कॉम्पटन’ – इंग्लिश क्रिकेटपटू यांचे निधन. (जन्म: 23 मे 1918)
- 2000 : ‘बाबासाहेब भोपटकर’ – 40 वर्षे लालबागमधील भारतमाता चित्रपटगृह चालवणारे यांचे निधन.
- 2001 : ‘जयंतराव टिळक’ – संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे नेते आणि गोवा मुक्ती संग्रामातील सेनापती यांचे निधन. (जन्म: 12 ऑक्टोबर 1921)
- 2007 : ‘बोरिस येलत्सिन’ – रशियन फेडरेशनचे पहिले अध्यक्ष यांचे निधन. (जन्म: 1 फेब्रुवारी 1931)
- 2013 : ‘शमशाद बेगम’ – पार्श्वगायिका यांचे निधन. (जन्म: 14 एप्रिल 1919)
दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.
Facebook Comments Box