



Konkan Railway: यंदा उन्हाळी सुट्टीत कोकणात जाणार्या चाकरमान्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. रेल्वे प्रशासनाने कोकण रेल्वे मार्गावर धावणार्या एका विशेष गाडीला मुदतवाढ दिली आहे.
०११०३/ ०११०४ लोकमान्य टिळक (टी) – मडगाव जं. – लोकमान्य टिळक (टी) साप्ताहिक विशेष गाडीला मुदत वाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे
गाडी क्रमांक ०११०४ मडगाव जं. – लोकमान्य टिळक (टी) साप्ताहिक विशेष एक्सप्रेस या गाडीची मुदत दिनांक ०४/०५/२०२५ रोजी संपणार होती तिला २५/०५/२०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ही दर रविवारी १६:३० वाजता मडगाव जंक्शन येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ०६:२५ वाजता लोकमान्य टिळक (टी) येथे पोहोचेल.
गाडी क्रमांक ०११०३ लोकमान्य टिळक (टी) -मडगाव साप्ताहिक विशेष एक्सप्रेस या गाडीची मुदत दिनांक ०५/०५/२०२५ रोजी संपणार होती तिला २६/०५/२०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ही गाडी दर सोमवारी एलटीटी वरुन ०८:२० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री २१:४० वाजता मडगाव या स्थानकावर पोहोचेल.
ही गाडी करमाळी, थिविम, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापुरा रोड, विलवडे, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पेण, पनवेल आणि ठाणे या स्थानकांवर थांबेल.
डब्यांची रचना : एकूण २० एलएचबी कोच : टू टायर एसी – ०१ कोच, थ्री टायर एसी – ०३ कोच, थ्री टायर इकॉनॉमी – ०२ कोच, स्लीपर – ०८ कोच, जनरल – ०४ कोच, जनरेटर कार – ०१, एसएलआर – ०१.