रेल्वे मंत्रालयाने १२८.७८ कोटी खर्चाच्या मिरज कॉर्ड लाईन ( १.७३ किमी ) प्रकल्पाला मान्यता दिली आहे. या संदर्भात रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी निर्णय घेतला आहे. या प्रस्तावित रेल्वे मार्गामुळे रेल्वेच्या प्रवासी आणि मालमत्ता गाड्यांची वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे.
रेल्वे कनेक्टीव्हिटी आणि मालवाहतूक कार्यक्षमता वाढविण्यासाठी रेल्वे मंत्र्यानी मोठे पाऊल उचलले आहे. मध्य रेल्वे अंतर्गत बांधण्यात येणाऱ्या या मिरज कॉर्ड ( Miraj Chord Line ) लाईनमुळे पश्चिम महाराष्ट्रातील मिरज जंक्शनवरील रेल्वे इंजिनांना बदलण्याची झंझट वाचणार आहे. त्यामुळे रेल्वेची परिचलन सुलभ होऊन प्रवाशांच्या वेळेत बचत होणार आहे.
इंटरचेंज पॉईंट मिळणार
मिरज कॉर्ड लाईन ( १.७३ किमी ) प्रकल्पाला रेल्वे मंत्रालयाने मंजूरी दिल्याने मल्टी ट्रॅकिंग, फ्लायओव्हर आणि बायपास लाईन क्षमतेत वाढ होणार आहे. तसेच मिरज जंक्शनवरील रेल्वे परिचलन सुलभ होणार आहे. त्यामुळे मिरज-पुणे, मिरज-कोल्हापूर, मिरज-पंढरपूर आणि मिरज-लोंढा सारख्या मार्गांना जोडणारा एक प्रमुख इंटरचेंज पॉईंट उपलब्ध होणार आहे.
सध्या कुर्डुवाडू किंवा हुब्बाळी येथून येणारी आणि कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या ट्रेनला १२० मिनिटांचा काळ लागतो. कारण इंजिन किंवा ब्रेक व्हॅन बदलण्यासाठी मिरज येथे ट्रेनला मागे घेऊन डब्बे जोडण्याची वेळ जातो. त्यामुळे या ट्रेनच्या प्रवाशांचा वेळ वाया जातो. पश्चिम महाराष्ट्रातील रेल्वे पायाभूत सुविधा अपग्रेड करण्याच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे आणि या प्रदेशात अधिक कार्यक्षम गतीने मालगाडी आणि प्रवासी रेल्वे गाड्यांचा मार्ग मोकळा होणार आहे. मिरज ते कोल्हापूर जलद प्रवासा व्हावा यासाठी या जोड मार्गाची मागणी प्रवाशांकडून होत होती. आता दीर्घकाळापासूनची ही मागणी पूर्ण होणार आहे.
Facebook Comments Box
Related posts:
Important Notice: कोकण रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची सूचना.
महाराष्ट्र
नवनिर्वाचित मंत्र्यांना दालनांचे आणि बंगल्यांचे वाटप.. कोणाला कुठला बंगला? यादी वाचा....
महाराष्ट्र
रेल्वे प्रवासात खाद्यपदार्थ विकत घेत असाल तर हा विडिओ पहाच; खाद्यपदार्थ विक्रेत्यांचा प्रवाशांच्या आ...
महाराष्ट्र


