



मुंबई: काल मंगळवारी (10 जून) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत दारू विक्रीवरील करात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारच्या महसूल वाढीच्या दृष्टीकोनातून उत्पादन शुल्क विभाग मद्यविक्रीवरील कर वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे आता मद्यप्रेमींच्या खिशाला मोठी झळ बसणार असून, त्यांचे ‘सेलिब्रेशन’ देखील महागणार आहे.
राज्य शासनाच्या या निर्णयामुळे, मद्यावरील शुल्क वाढीमुळे राज्याच्या तिजोरीत तब्बल 14,000 कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल वाढणार आहे. राज्य सरकारच्या महसूल वाढीच्या उद्दिष्टासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे दिसते.
काय असतील नवे दर?
भारतीय बनावटीच्या विदेशी मद्याच्या (IMFL) रू. २६०/- प्रति बल्क लिटर पर्यंत निर्मिती मूल्य घोषित केलेल्या मद्यावरील उत्पादन शुल्काचा दर निर्मिती मूल्याच्या ३ पट वरुन ४.५ पट करण्यात येणार. देशी मद्यावरील उत्पादन शुल्काचा दर प्रति प्रुफ लिटर रुपये १८०/- वरुन रुपये २०५/- करण्यात येणार.
महाराष्ट्र मेड लिकर (MML) हा धान्याधारित विदेशी मद्याचा नवीन प्रकार तयार करण्यास मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये फक्त महाराष्ट्रातील मद्य उत्पादक असे उत्पादन करु शकतील. त्यांना या नव्या प्रकारातील उत्पादनाची (ब्रँड) नवीन नोंदणी करुन घेणे आवश्यक राहील.
उत्पादन शुल्काच्या दरातील वाढ व अनुषंगिक एमआरपी सूत्रातील बदल यामुळे १८० मि.ली. बाटलीची किरकोळ विक्रीची किमान किंमत मद्य प्रकारनिहाय पुढीलप्रमाणे :- देशी मद्य ८० रूपये, महाराष्ट्र मेड लिकर (MML) – १४८ रूपये, भारतीय बनावटीचे विदेशी मद्य- २०५ रूपये, विदेशी मद्याचे प्रिमियम ब्रँड – ३६० रूपये. ही वाढ थेट ग्राहकांच्या खिशावर परिणाम करणार आहे.
राज्याच्या महसुलात वाढ करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने मद्यविक्रीवरील कर वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय बनावटीच्या विदेशी मद्यावर (IMFL) दीड टक्क्याने वाढ करण्यात आली आहे. त्याचबरोबर, विदेशी मद्यावरही हा कर वाढविण्यात आल्याने आता मद्यप्रेमींसाठी हा निर्णय खिशाला झळ देणारा ठरणार आहे.
Facebook Comments Box
Related posts:
Loksabha Election 2024: मतदानाच्या टक्केवारीत सावंतवाडी सरस | राज्यात अपेक्षेपेक्षा कमी मतदान.. जाणू...
कोकण
Konkan Railway: मोठ्या थाटात सुरु केलेल्या या एक्सप्रेसच्या प्रवासी संख्येत घट; 'ती' आशाही ठरली फोल
महाराष्ट्र
कोकण रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण आणि अन्य मागण्यांसाठी खासदार रविंद्र वायकर यांची केंद्रीय रेल्वे मंत्...
महाराष्ट्र