नवी दिल्ली: वाढती प्रवासी संख्या आणि रेल्वे प्रवासाची वाढती मागणी लक्षात घेता, भारतीय रेल्वेने आगामी ५ वर्षांत देशातील प्रमुख शहरांमधील रेल्वेगाड्या हाताळण्याची क्षमता दुप्पट करण्याचा महत्त्वाकांक्षी आराखडा तयार केला आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या संदर्भात माहिती दिली असून, सन २०३० पर्यंत ही क्षमता वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
या योजनेचा मुख्य भर गर्दी कमी करणे, नवीन गाड्या सुरू करणे आणि देशभरातील कनेक्टिव्हिटी सुधारणे यावर असेल.
पुणे आणि मुंबईसह ४८ शहरांची निवड
रेल्वे मंत्रालयाने या प्रकल्पासाठी देशातील ४८ प्रमुख शहरांची यादी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये मुंबई, पुणे, नागपूर, दिल्ली, कोलकाता, चेन्नई आणि हैदराबाद यांसारख्या महानगरांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, केवळ मुख्य टर्मिनल्सवर भार न टाकता आजूबाजूच्या उपनगरीय स्थानकांचाही विकास केला जाणार आहे.
पुणे शहराचे उदाहरण: पुणे स्टेशनवरील ताण कमी करण्यासाठी हडपसर, खडकी आणि आळंदी या स्थानकांचा विकास करून तिथे प्लॅटफॉर्म आणि स्टॅब्लिंग लाईन्सची संख्या वाढवली जाईल.
क्षमतेत वाढ करण्यासाठी ‘हे’ असतील ४ मुख्य टप्पे:
१. टर्मिनल विस्तार: विद्यमान टर्मिनल्सवर अतिरिक्त प्लॅटफॉर्म, स्टॅब्लिंग लाईन्स आणि पिट लाईन्सची निर्मिती करणे.
२. नवीन टर्मिनल्स: शहरी भागाच्या परिसरात नवीन रेल्वे टर्मिनल्स शोधणे आणि विकसित करणे.
३. देखभाल सुविधा: गाड्यांच्या देखभालीसाठी ‘मेगा कोचिंग कॉम्प्लेक्स’ उभारणे.
४. तांत्रिक सुधारणा: सिग्नल यंत्रणेचे आधुनिकीकरण, मल्टी-ट्रॅकिंग आणि रेल्वे यार्डांमधील अडथळे दूर करणे.
तात्काळ आणि दीर्घकालीन नियोजन
हा प्रकल्प जरी २०३० पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य असले, तरी प्रवाशांना याचा लाभ लवकरात लवकर मिळावा यासाठी कामांची विभागणी ‘तात्काळ’, ‘अल्पकालीन’ आणि ‘दीर्घकालीन’ अशा तीन श्रेणींमध्ये करण्यात आली आहे. उपनगरीय (Suburban) आणि लांब पल्ल्याच्या (Non-suburban) अशा दोन्ही प्रकारच्या वाहतुकीसाठी स्वतंत्र नियोजन केले जाणार आहे.
”आम्ही प्रवासी मागणी पूर्ण करण्यासाठी आणि स्थानकांवरील गर्दी कमी करण्यासाठी कोचिंग टर्मिनल्सचा विस्तार करत आहोत. या निर्णयामुळे रेल्वे नेटवर्क अधिक सक्षम होईल आणि कनेक्टिव्हिटी सुधारेल.”
— अश्विनी वैष्णव, केंद्रीय रेल्वेमंत्री
यादीतील काही प्रमुख शहरे:
दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, बेंगळुरू, अहमदाबाद, पुणे, नागपूर, वाराणसी, कानपूर, जयपूर, लखनौ, पटना आणि गुवाहाटी यांसह एकूण ४८ शहरांचा या विशेष योजनेत समावेश आहे.
या निर्णयामुळे येत्या काळात रेल्वे प्रवाशांना अधिक गाड्या, कमी प्रतीक्षा यादी आणि स्थानकांवर चांगल्या सुविधा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
शहरांची यादी
१. दिल्ली (Delhi)
२. मुंबई (Mumbai – CR, WR)
३. कोलकाता (Kolkata – ER, SER, Metro)
४. चेन्नई (Chennai)
५. हैदराबाद (Hyderabad)
६. बेंगळुरू (Bangalore)
७. अमदावाद (Amdavad)
८. पटणा (Patna)
९. लखनौ (Lucknow – NR, NER)
१०. पुणे (Pune)
११. नागपूर (Nagpur – CR, SECR)
१२. वाराणसी (Varanasi – NR, NER)
१३. कानपूर (Kanpur)
१४. गोरखपूर (Gorakhpur)
१५. मथुरा (Mathura)
१६. अयोध्या (Ayodhya)
१७. आग्रा (Agra)
१८. पं. दीनदयाळ उपाध्याय जंक्शन (Pt Deen Dayal Upadhyay Jn)
१९. चंदीगड (Chandigarh)
२०. लुधियाना (Ludhiana)
२१. अमृतसर (Amritsar)
२२. इंदूर (Indore)
२३. भोपाळ (Bhopal)
२४. उज्जैन (Ujjain)
२५. जम्मू (Jammu)
२६. जोधपूर (Jodhpur)
२७. जयपूर (Jaipur)
२८. वडोदरा (Vadodara)
२९. सुरत (Surat)
३०. मडगाव (Madgaon)
३१. कोचीन (Cochin)
३२. पुरी (Puri)
३३. भुवनेश्वर (Bhubaneshwar)
३४. विशाखापट्टणम (Vishakhapatnam)
३५. विजयवाडा (Vijaywada)
३६. तिरुपती (Tirupati)
३७. हरिद्वार (Haridwar)
३८. गुवाहाटी (Guwahati)
३९. भागलपूर (Bhagalpur)
४०. मुझफ्फरपूर (Muzaffarpur)
४१. दरभंगा (Darbhanga)
४२. गया (Gaya)
४३. मैसूर (Mysore)
४४. कोइम्बतूर (Coimbatore)
४५. टाटानगर (Tatanagar)
४६. रांची (Ranchi)
४७. रायपूर (Raipur)
४८. बरेली (Bareilly)


